हुंड्यासाठी सासरच्यांचा सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न

  Kandiwali (W)
  हुंड्यासाठी सासरच्यांचा सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न
  मुंबई  -  

  कांदिवली - हुंड्यासाठी सासरच्यांनी सुनेला फिनाईल पाजून मारण्याचा प्रयत्न कल्याची घटना समोर आली आहे. नवघर रोड परिसरातील चंद्रावती प्लाजा इमारतीच्या 204 क्रमांकाच्या प्लॅटमध्ये हा प्रकार घडला. विजयलक्ष्मी असे या विवाहित महिलेचे नाव आहे. तिच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  विजयलक्ष्मी मंगळवारी आपल्या आईशी फोनवर बोलत होती. त्यावेळी सासू, सासरे, नणंद आणि दीर या सर्वांनी तिला मारहाण केली आणि फिनाईल पाजून मारण्याचा प्रयत्न केला. पण फोन चालू असल्याने विजयलक्ष्मीच्या माहेरच्यांनी सर्व ऐकले. त्यानंतर तात्काळ तिचे माहेरचे कांदिवलीतल्या घरी पोहोचले आणि तिला शताब्दी रुग्णालयात दाखल केले.
  19 वर्षीय विजयलक्ष्मीचे 28 एप्रिल 2016 ला अनिल तिवारीसोबत लग्न झाले होते. पण लग्न झाल्यापासून सासरच्यांनी हुंड्यासाठी त्रास द्यायला सुरुवात केली. तसेच दीरही अश्लील वर्तन करायचा, असा आरोप विजयलक्ष्मीने सासरच्यांवर केला. पोलिसांनी याप्रकरणी तिचा नवरा अनिल तिवारी, सासू-सासरे, दीर सुनील तिवारी आणि नणंद खुशबू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.