नाल्यात सापडलं पाच दिवसांचं बाळ

बोरिवली - बोरिवलीच्या नॅशनल पार्क परिसरातील श्रीकृष्ण कॉम्पलेक्सच्या बाजूच्या नाल्यात 5 दिवासांचं एक लहान बाळ सापडलंय. हे लहान बाळ कोण नाल्यात सोडून गेलंय याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान सतीश सिंह हे नाल्याच्या बाजूनं जात असताना त्यांना या बाळाचा रडण्याचा आवाज आला. त्यांना नाल्यात हे बाळ आढळलं. त्यांनी लगेच लहान बाळाला बाहेर काढून हस्पिटलमध्ये दाखल केलं. दरम्यान, या बाळाची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

 

 

 

Loading Comments