मुलीचं अपहरण करणारे गजाआड

मालाड - 5 डिसेंबरला मालाड पश्चिमेतील मार्वे रोड स्मशानभूमीच्या नाल्याशेजारील एका झोपडीतून 3 महिन्यांच्या मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. मुलीचे अपहरण करणाऱ्यांनी मुलीला मानखुर्दला विकले होते. त्यानंतर 14 तासांच्या आतच त्या मुलीचा तीन ठिकाणी सौदा झाला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे 7 जणांना अटक केली असून, मुलीला सुखरूप कुटुंबाच्या हवाली केले आहे. आरोपींमध्ये 6 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

 

Loading Comments