आयएसआयचे मुंबई कनेक्शन, नागपाड्यातून एजंट अटकेत


आयएसआयचे मुंबई कनेक्शन, नागपाड्यातून एजंट अटकेत
SHARES

आयएसआयसाठी भारतात हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली आफताब अली याला युपी पोलिसांनी फैजाबादमधून अटक केली आहे. आफताब हा मुंबईच्या नागपाडा परिसरातला रहिवासी आहे. अल्ताफ कुरैशी नावाचा एक व्यक्ती हवालाकडून त्याला पैसे पाठवत होता. मुंबई पोलीस आणि युपी एटीएस यांच्या संयुक्त कारवाईत अल्ताफ कुरैशीला देखील अटक करण्यता आली आहे.

अल्ताफ हा मूळचा गुजरातच्या राजकोटमधील राहणारा आहे. मागील अनेक वर्षांपासून तो मुंबईच्या नागपाडा परिसरात रहात होता. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अल्ताफकडून 70 लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. अल्ताफने यापूर्वी आफताब किंवा आयएसआयच्या आणखी कोणत्या एजेंटला पैसे पुरवले का? याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच यामध्ये अल्ताफ व्यतिरिक्त आणखी कोणाचा सहभाग आह का? याचाही पोलीस तपास करत आहेत. यूपी एटीएसने दिलेल्या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी रात्रभर अाग्रीपाडातल्या युसूफ मंजिल परिसरातल्या रहिवाशांकडे विचारणा करत त्यांचा जबाब नोंदवला. पण आफताब आणि अल्ताफ यांचे काय नाते आहे याचा उलगडा अद्याप झालेला नाही.


हे वाचा - 

उत्तर प्रदेशमधून आयएसआय एजंटला अटक


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा