भुजबळांची 300 कोटींची संपत्ती जप्त


भुजबळांची 300 कोटींची संपत्ती जप्त
SHARES

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तुरूंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या मागील तपास यंत्रणांचा ससेमीरा अद्याप संपलेला नाही. प्राप्तिकर विभागाने बेनामी व्यवहार कायद्यांतर्गत कारवाई करीत भुजबळ कुटुंबीयांची देशभरातील 300 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

भुजबळ मार्च 2016 पासून आर्थररोड तुरुंगात आहेत. तेव्हापासून देशातील सर्व तपास यंत्रणांनी भुजबळांच्या मागे तपासाचा ससेमीरा लावला आहे. बोगस कंपन्यांच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांमधून घेतलेल्या मालमत्तेवर बुधवारी प्राप्तिकर विभागाने कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.


या मालमत्तांचा समावेश

  • जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये नाशिक जिल्ह्यातील साखर कारखाना (80 कोटी), सांताक्रूझमधील अलिशान घर (11 कोटी 30 लाख) यांचा समावेश आहे.
  • त्याशिवाय वांद्रे पश्चिमेकडील हबिब मनोर आणि फातिमा मनोर या इमारतीही जप्त करण्यात आल्या आहेत. या इमारतींची किंमत सुमारे 43 कोटी 61 लाख रुपये आहे.
  • पनवेलमधील 87 कोटी रुपयांचा एक भूखंडही जप्त करण्यात आला आहे. कागदोपत्री या मालमत्तेची किंमत २२३ कोटी असली बाजारभावानुसार या मालमत्तेची किंमत ३०० कोटींपेक्षा जास्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • त्याचप्रमाणे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात देखील भुजबळांची संपत्ती असून, त्यावर टाच अाणत या प्रकरणाची कागदपत्रे जमा करण्यास प्राप्तिकर विभागाने सुरुवात केली आहे.



हे देखील वाचा -

दीड वर्षांनंतर भुजबळ विधिमंडळात ठेवणार 'पहिलं पाऊल'



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा