जे. जे. रुग्णालयातून कैदी फरार

 Nagpada
जे. जे. रुग्णालयातून कैदी फरार
Nagpada, Mumbai  -  

सुनावणीसाठी न्यायालयात किंवा उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येणारे कैदी संधीचा फायदा घेत पोलिसांना गुंगारा देऊन फरार होत असल्याच्या घटना अलिकडच्या काळात वाढल्या आहेत. असाच एक प्रकार गुरुवारी घडला. तळोजा कारागृहातून उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात आणलेल्या कैद्यानं पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढल्यानं एकच खळबळ उडाली आहे. गेल्या 15 दिवसांत अशा प्रकारे कैदी फरार होण्याची ही तिसरी घटना असल्याने, पोलिसांच्या बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बोरिवली पोलिसांनी चोरी प्रकरणात अटक केलेल्या मोबिन मोहम्मद शमीम सिद्दीकी या कैद्याला गुरुवारी तळोजा जेलमधून सुरक्षा व्यवस्थेत जे. जे. रुग्णालयात आणले होते. रुग्णालयात मोबिनच्या हाताची बेडी काढल्यानंतर त्याने संधीचा फायदा घेत पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला. मोबिन विरोधात जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


हेही वाचा

मोक्का प्रकरणातील आरोपी जेजे रुग्णालयातून फरार


यापूर्वी आर्थर रोड जेलच्या गेटवरून गेल्या गुरुवारी हॅरिसन अॅन्थोनी जोसेफ (37) या कैद्याने पोलिसांना धक्का देऊन पळ काढला होता. त्याचप्रकारे फय्याज मंजूर अहमद याने देखील आर्थररोड जेलच्या समोरून पळ काढला होता. या दोन्ही कैद्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Loading Comments