डाॅक्टर बाॅम्ब जलीश अन्सारीला कानपूरमधून अटक

५० पेक्षा जास्त बॉम्बस्फोटात डाॅ. जलीश अन्सारी (Dr. jalees ansari) त्याचा सहभाग होता. त्यामुळे त्याला डॉ. बॉम्ब (Dr. bomb ) असेही संबोधत.

SHARE

राजस्थान(Rajsthan)च्या अजमेर येथील बॉम्ब स्फोटा(Bomb blast)त जन्मठेपेच्या शिक्षेतील फरार दहशतवादी (Terrorist) डॉ. जलीश अन्सारी(Dr. jalees ansari)ला उत्तरप्रदेश(Uttar Pradesh)च्या कानपूर(Kanpur)मधून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. ५० पेक्षा जास्त बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग होता. त्यामुळे त्याला डॉ. बॉम्ब असेही संबोधत असत. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातही त्याचा सहभाग होता. लवकरच जलीसची रवानगी राजस्थानच्या जयपूर तुरुंगात करण्यात येणार आहे.

मुंबईतील आग्रीपाडा (agripada police) येथीस मोमिनपाडाच्या बीआयटी चाळीत तो कुटुंबियांसोबत रहात होता. एकेकाळी मुंबई (Mumbai) महानगरपालिकेत डॉक्टर (doctor) म्हणून काम करणाऱ्या जलीश अन्सारीने बाबरी मशिदीचं पतन झाल्यानंतर करीम तुंडाच्या संपर्कात येऊन नव्वदच्या काळामध्ये पाकिस्तान(pakistan)मध्ये जाऊन बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतलं होतं. त्यानंतर बॉम्ब बनवण्यामध्ये प्राविण्य मिळवलं. १९९२ साली राजस्थानच्या अजमेरमध्ये (Ajmer) बाॅम्बस्फोट घडवून आणला होता. अजमेर ब्लास्टमधील त्याचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपे(lifetime imprisonment)ची शिक्षा सुनावली होती. ५० पेक्षा जास्त बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग होता. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातही त्याचा सहभाग होता.

हेही वाचाः- सिडको पोलिसांसाठी बांधणार घर- एकनाथ शिंदे यांच्या सूचना

६८ वर्षीय जलीश नुकताच २१ दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता. पॅरोल (Parole) मंजूर झालेल्या अन्सारीला दर दिवशी मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनध्ये त्याला हजेरी द्यायची होती. मात्र १६ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता घरातून नमाज पठण करण्यासाठी जात असल्याचं सांगून तो अचानक गायब झाला. अन्सारीचा शोध न लागल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी मुंबईतील आग्रीपाडा पोलिस ठाण्यांमध्ये तो गायब झाल्याची तक्रार नोंदवली होती. अखेर जलीशला उत्तरप्रदेशच्या कानपूरमधून अटक करण्यात पोलिसांना यश आलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या