जिया खानच्या आईने मागितली पंतप्रधानांकडे दाद


जिया खानच्या आईने मागितली पंतप्रधानांकडे दाद
SHARES

अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयात लढा देणाऱ्या तिच्या आईने आता थेट पंतप्रधान नरेंद मोदींना साकडं घातलं आहे. जियाची आई राबिया खान यांनी मोदींना पत्र लिहून आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रात राबिया खान यांनी आपल्या मुलीचा मृत्यू ही आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा केला आहे.



३ जून २०१३ साली जुहू येथील फ्लॅटमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत जियाचा मृतदेह सापडला होता. मात्र ती आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा पुनरुच्चार राबिया यांनी आपल्या पत्रात केला आहे. आपल्या पत्रात त्यांनी सीबीआयच्या तपासावर देखील नाराजी व्यक्त केली आहे.


जियाचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं दर्शवणारे परदेशी फॉरेन्सिक तज्ज्ञांचे रिपोर्ट देखील राबिया यांनी सादर केले. याआधी देखील राबिया यांनी मोदी सरकारकडे आपल्या मुलीच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली होती.



काय म्हटलं पत्रात?

मी एक ब्रिटिश नागरिक आणि जियाची आई बोलतेय, जियाची ३ जून २०१३ साली मुंबईत हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या चार वर्षांनंतरही मी तिच्यासाठी न्यायाची लढाई लढतेय. भारतातील आणि इंग्लंड मधील तज्ज्ञांचे रिपोर्ट हे जियाची हत्या झाल्याचं स्पष्ट संकेत देत असल्याचं राबिया यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

या प्रकरणी तपास करणारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यास असमर्थ ठरल्याचं राबिया यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी देखील त्यांनी मोदींकडे केली आहे.

मी आशा करते की माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर उभ्या राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे मला मिळतील. आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल, अशी आशा आहे. ज्या आईने तिची मुलगी गमावली आहे, त्या आईला तुम्ही काय सांगाल, असं राबियांनी आपल्या पात्रात मोदींना विचारलं आहे.


ज्या ठिकाणी प्रत्येकाचं ऐकलं जातं त्या प्रत्येक ठिकाणी मी माझं गाऱ्हाणं मांडत आहे. देवाने तुम्हाला सर्वोच्च जागी बसवलं असून या अन्यायाविरुद्ध तुम्ही आम्हाला वाचावा. एक पालक म्हणून तुम्ही माझं दुःख समजू शकता, असं देखील त्या म्हणाल्या आहेत.



हेही वाचा -
या प्रथितयश अभिनेत्रींनी का केली आत्महत्या?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा