नोकरीच्या नावाखाली शिक्षिकेला चार वर्ष राबवले

महिलेने पैशांची जमवाजमव करून दोन महिन्यात ८ लाख ८५ हजार रुपये धनादेश आणि रोख रुपयांच्या स्वरूपात जमा केले.

नोकरीच्या नावाखाली शिक्षिकेला चार वर्ष राबवले
SHARES

मुंबईच्या परळ येथे नोकरी देण्याच आमीष दाखवून एका शिक्षिकेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेने दा.भ.मार्ग पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अरूण देवीप्रसाद सिंग (४०) याला अटक केली आहे. चारवर्ष कामकरून देखील पगार न दिल्याच्या आरोप महिलेने आरोपीवर केला आहे.

विलेपार्लेचा रहिवाशी असलेला अरूण सिंग याचे नातेवाईक परळ येथील एका हिंदी शाळेवर ट्रस्टी आहेत. शाळेकडून दिपक संग यांनी नोकरीची जाहिरात दिली होती. त्यानुसार तक्रारदार महिलेने  शाळेत येऊन मुलाखत दिली होती. महिलेने दिलेल्या संपर्क क्रमाकांवर अरूण यांनी फोन करून नोकरी हवी असल्यास दहा लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने पैशांची जमवाजमव करून दोन महिन्यात ८ लाख ८५ हजार रुपये धनादेश आणि रोख रुपयांच्या स्वरूपात जमा केले.

हेही वाचाः- शनिवारपासून सुरू होणार राज्यात रस्ते सुरक्षा अभियान

त्यानंतर महिलेने त्या शाळेत महिनाभर काम ही केले. मात्र काम करून सुद्धा पगार दिला जात नसल्यामुळे महिलेने त्याबाबत चौकशी केली. त्यावेळी कामावर पर्मन्ट झाल्यावर एकत्र पगार दिला जाईल असे सांगण्यात आले. मात्र चार वर्षानंतर महिलेच्या हातात ना पगार आला, ना ती पर्मन्ट असल्याचे तिला कळले. याबाबत आरोपीकडे चौकशी केल्यानंतर त्याने पैसे परत देऊ असे सांगितले. मात्र दिलेल्या वेळेत अरूण आणि त्याच्या दोन साथीदारांना पैसे परत न केल्याने महिलेने नोंदवलेल्या तक्रारीनुसार त्या शाळेचे ट्रस्टी माणिकलाल शाह आणि दिपक सिंग यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली.    या प्रकरणात अरूण हा वेळोवेळी पोलिसांना चकवा देत होता. अखेर पोलिसांनी त्याला पकडून जेरबंद केले. अशा प्रकारे या टोळीने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुशंगाने पोलिस तपास करत आहेत.

 हेही वाचाः- JNU विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर मुंबईत गुन्हे दाखल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा