शनिवारपासून सुरू होणार राज्यात रस्ते सुरक्षा अभियान

आगामी रस्ते सुरक्षा सप्ताहात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयातील तरुण-तरुणी यांच्यासह समाजमाध्यमांवर रस्ते सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

SHARE

राज्यात वाढत्या अपघातांचा आकडा पाहता हे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाच्या गृह-परिवहन विभागाकडून ११ ते १७ जानेवारीदरम्यान रस्ते सुरक्षा अभियान राबविले जाते.यंदाचे हे ३१ वे सुरक्षा अभियान आहे. त्यानिमित्ताने गृहविभागाने  पोलिस महासंचालकांना शालेय शिक्षण विभाग, परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, वाहतूक पोलिस विभागांना सूचना देण्याच्या सूचना केल्या आहेत.

रस्ते अपघातांच्या आकडेवारी पहिल्या पाच राज्यात महाराष्ट्राचा नंबर आहे. त्यामुळेच मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षात अपघातांचे प्रमाण १० टक्यांनी कपात करण्याचे लक्ष पहिवहन विभागाकडून निश्चित करण्यात आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी आगामी रस्ते सुरक्षा सप्ताहात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयातील तरुण-तरुणी यांच्यासह समाजमाध्यमांवर रस्ते सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा ः- भारत बंद; २५ कोटी कामगारांचा देशव्यापी संपावर

राज्यात दरवर्षी सुमारे ३५ हजारांहून अधिक रस्ते अपघातांमध्ये १३ हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू होतो. २०१९ नोव्हेंबर अखेर राज्यात सुमारे ३०,०८४ अपघातांची नोंद करण्यात आली आहे. या अपघातांमध्ये एकूण ११३८७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, २६४२८ प्रवासी जखमी झाले आहेत. रस्ते सुरक्षा सप्ताहासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने विशेष निधी पुरवण्यात येतो. याचा योग्य वापर सुरक्षा उपक्रमांसाठी खर्च करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या