जोगेश्वरीत घरफोडीला आळा बसेल का?

 Sham Nagar
जोगेश्वरीत घरफोडीला आळा बसेल का?
जोगेश्वरीत घरफोडीला आळा बसेल का?
See all

जोगेश्वरी - श्याम नगर, सर्वोद्य नगरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून घरफोडीचं सूत्र सुरू आहे. शनिवारी मध्यरात्री सहा घरांमध्ये घरफोडी झाल्याची घटना घडलीय. चोरांनी सोने, चांदी, मोबाईल, रोकड चोरी केलीय. स्थानिक रहिवाशांकडून पोलीस गस्त वाढवावा अशी वारंवार मागणी होतेय. श्यामनगर परिसरात राहणारे प्रवीण शिंदे, चंद्रकांत मालाडकर, चंद्रकांत परब यांच्य घरामध्ये मध्यरात्री 2 ते 2.15च्या सुमारास घर बंद असाताना चोरी झाली. गुन्ह्यांची नोंद मेघवाडी पोलीस स्थानकात केली गेली आहे. घटनास्थळी श्वानपथकाच्या मदतीनं तपास करण्यात आला .पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधव हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. सीसीटीव्ही लावण्याबाबत आणि पोलीस गस्त वाढवण्याबाबत केलेल्या मागणीला दुर्लक्ष केलं जातं असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. तीन महिन्यांपूर्वी स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पोलीस अधिकारी आणि पालिका प्रशासनाकडे यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. तसंच प्रत्येक चाळीत लाईट लावून देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अशी कोणतीही अमंलबजावणी करण्यात आलं नसल्याचं किशोर उमरोटकर यांनी सांगितलं.

Loading Comments