सचिन वाझे यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

एनआयएच्या विशेष न्यायालयात शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली. यावेळी वाझे यांनी केलेल्या एकूण तीन मागण्यांपैकी दोन मागण्या न्यायालयाने फेटाळल्या आहेत.

सचिन वाझे यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
SHARES

अँटालिया स्फोटक प्रकरणातील निलंबित पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांच्या कोठडीत ५ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.  त्यांचा सहकारी रियाज काझी यांच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. 

एनआयएच्या विशेष न्यायालयात शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली. यावेळी वाझे यांनी केलेल्या एकूण तीन मागण्यांपैकी दोन मागण्या न्यायालयाने फेटाळल्या आहेत. वाझे यांनी आपल्या वकिलामार्फत एक पेन, कागद आणि कार्बन पेपर मिळावा असं म्हटलं होतं. मात्र, वाझे यांची ही मागणी न्यायालयाने फेटाळली. त्याबरोबरच वैद्यकीय उपचारासंदर्भातली औषध मिळावी यासाठीसुद्धा वाझे यांनी दुसरा अर्ज केला होता. मात्र प्रिस्कीप्शन नसल्याने सोबत प्रिस्कीप्शन जोडा असा युक्तिवाद यावेळी एनआयच्या  वकिलांनी न्यायालयात केला. वाझे यांनी दैनंदिन वापरात लागणारे साहित्य मिळावे अशीसुद्धा न्यायालयाकडे विनंती केली होती. मात्र, तो अर्जसुद्दा न्यायालयाने फेटाळला आहे.

उद्योगपती मुकेश अंबनी यांच्या अँटेलिया घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत ठेवण्यात आलेली स्फोटकं तसेच उद्योजक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर  सचिन वाझे यांची सलग दोन दिवस कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर १४ मार्च रोजी रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना एनआयच्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. ते २७ दिवस एनआयएच्या कोठडीत होते. त्यांना ९ एप्रिल रोजी एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर केल्यांनतर कोर्टाने त्यांना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. हेही वाचा 

  1. विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील ICU विभागात आग, १३ जणांचा मृत्यू

  1. 'ऑक्सिजन' एक्स्प्रेस महाराष्ट्राकडे रवाना

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा