युग तुलीला २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी


युग तुलीला २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
SHARES

कमला मिल कंपाऊंडमधील मोजोस बिस्ट्रोचा सहमालक युग तुलीला भोईवाडा न्यायालयाने २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मोजोसमधील हुक्का पार्लर तुलीच्याच पुढाकाराने सुरू झाल्याने या प्रकरणांत तुलीचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं पोलिसांतर्फे सरकारी वकिलांनी सांगितलं.


तुलीनेच मिळवला हुक्का पार्लरचा परवाना

अग्निशमन दलाच्या चौकशी अहवालात मोजोस बिस्ट्रोला सर्वप्रथम आग लागल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तुली फरार झाला होता. मोजोसमधील अनधिकृत कामांमध्ये तुलीचा सहभाग असून तो महत्वाचा आरोपी आहे. तसेच तुलीनेच मोजासला हुक्का पार्लरचा परवाना मिळवून दिला. त्यामुळे तुलीची अधिक चौकशी होणं गरजेचंं असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं.


पोलिसांना सहकार्य केल्याचा दावा

तर तुलीतर्फे त्याचे वकील श्याम देवानी यांनी तुलीने आग लागल्यापासून प्रत्येक वेळी पोलिसांना सहकार्य केलं. तुलीने कायद्यानुसार अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु जामीन नाकारण्यात आल्याने तुली स्वत: हून पोलिस ठाण्यात मंगळवारी हजर झाल्याचं न्यायालयाला सांगितलं. त्यामुळे चौकशीसाठी २ दिवसांव्यतिरिक्त जास्त कोठडी न देण्याची मागणीही न्यायालयाकडे केली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत तुलीला २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.



हेही वाचा-

कमला मिल आग: बघा 'असा' आला युग तुली पोलिसांच्या ताब्यात!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा