नोकरीहून काढल्याने कांदिवलीत महिलेची आत्महत्या

काही दिवसांपूर्वीच वाडिलाल हिला कामावरून काढण्यात आलं होतं. त्यामुळे ती नैराक्षेत होती. यातूनच तिने आत्महत्या करण्याचे ठरवले.

नोकरीहून काढल्याने कांदिवलीत महिलेची आत्महत्या
SHARES

मुंबईच्या कांदिवली परिसरातील नोकरीहून काढल्याच्या नैराक्षेतून ४० वर्षीय महिलेने गुरूवारी आत्महत्या केली. डिंपल वाडिलाल असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी चारकोप पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

चारकोपमधील रॉक एव्हेन्यू इमारतीत पीडित महिला रहात होती. काही दिवसांपूर्वीच वाडिलाल हिला कामावरून काढण्यात आलं होतं. त्यामुळे ती नैराक्षेत होती.  यातूनच तिने आत्महत्या करण्याचे ठरवले. डिंपल ही आत्महत्या करण्यासाठी राहत्या इमारतीच्या गच्छीवर गेली. त्यावेळी तिला स्थानिकांनी आत्महत्या न करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र डिंपलने त्याकडे दुर्लक्ष करत इमारतीहून उडी टाकून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचाः- अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या वकिलाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

डिंपल यांनी उडी टाकल्यानंतर तिला वाचवण्यासाठी काही जण  इमारती खाली उभे होते. डिंपल यांना पकडताना एका व्यक्तीच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिकांनी त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.   

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा