तुमचा मोबाईल चोरीला जाऊ शकतो!

 Daulat Nagar
तुमचा मोबाईल चोरीला जाऊ शकतो!

बोरीवली - कस्तुरबा मार्ग पोलिसांनी एका मोबाइल चोराला दहिसरमधून अटक केली आहे. त्या चोरट्याचं नाव रशीद खान असं असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर यामध्ये आणखी एका फरार चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत.

तो चोरटा ड्रग्ज पिण्यासाठी चोरी केलेले मोबाइल देऊन ड्रग्जची खरेदी करत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली. राज जयवाडिया हा तरुण बोरीवली स्थानक परिसरातून घरी जात असताना त्याचवेळी रशीद आणि त्याचा साथीदार बोलता बोलता राजजवळ गेले. त्या दोघांनी राजच्या हातातील मोबाइल हिसकावून घेऊन ते फरार झाले. राजने तात्काळ याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि रशीदला दहिसरच्या दौलतनगर परिसरातून अटक केली.

Loading Comments