अल्पवयीन मोबाईल चोरटे अटकेत, १२ मोबाईल जप्त!

पोलिसांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज काढून त्याचा आभास केला आणि त्यांनतर दोघा अल्पवयीन मोबाईल चोरांना अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी १२ महागडे मोबाईल जप्त केले आहेत.

अल्पवयीन मोबाईल चोरटे अटकेत, १२ मोबाईल जप्त!
SHARES

मुंबईत खार पोलिसांनी अल्पवयीन मुलांच्या एका अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे, की जी फक्त मौज मजेसाठी मोबाईल चोऱ्या करायची. आत्तापर्यंत या दोघांकडून खार पोलिसांनी १२ मोबाईल जप्त केले आहेत.


सीसीटीव्ही फुटेजवरून लागला शोध

वांद्रे आणि खार परिसरात गेल्या काही काळापासून मोबाईल चोऱ्यांचं प्रमाण वाढलं होतं. संध्याकाळच्या सुमारास वरिष्ठ नागरिक आणि महिलांना लक्ष केलं जात होतं. आरोपी हे रोज वेगवेगळ्या स्कूटरचा उपयोग करत असल्याने पोलिस देखील संभ्रमात होते. शेवटी पोलिसांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज काढून त्याचा आभास केला आणि त्यांनतर या दोघांना अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी १२ महागडे मोबाईल जप्त केले आहेत.


दोघेही उच्चभ्रू कुटुंबातील

१५ वर्ष वयोगटातील हे दोघे मित्र उच्चभ्रू घरातील असून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी कधीच कसली कमी पडू दिली नव्हती. ज्यावेळी त्यांना अटक करण्यात आली, तेव्हा त्यांच्या घरातल्यांना धक्काच बसला. हे दोघेही महागडे मोबाईल चोरी करायचे आणि त्यानंतर येईल त्या किंमतीत ते विकून टाकायचे.


चोरीसाठी मॉडिफाइड स्कूटरचा वापर

या दोघांनीही आपल्या स्कूटर या मॉडिफाय करून त्यांचा वेग आणि पीक-अप दोन्ही वाढवला होता. एका स्कूटरचे अनेक बॉडी पार्ट्स या दोघांनी बनवले होते आणि त्यांना वेगवेगळ्या रंगात रंगवण्यात आलं होतं. रोज चोऱ्या करताना हे गाडीचा रंग बदलून मोबाईल चोरी करत असल्याचं समोर आलं आहे.



हेही वाचा

हाय कोर्टाबाबत आक्षेपार्ह मजकूर, आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकरला अटक


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा