हाय कोर्टाबाबत आक्षेपार्ह मजकूर, आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकरला अटक

फेसबुकवर उच्च न्यायालयाची बदनामी करणे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबद्दल आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे हे माहिती अधिकार कार्यकर्ता केतन तिरोडकरला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

हाय कोर्टाबाबत आक्षेपार्ह मजकूर, आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकरला अटक
SHARES

फेसबुकवर उच्च न्यायालयाची बदनामी करणे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबद्दल आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे हे माहिती अधिकार कार्यकर्ता केतन तिरोडकरला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी केतन तिरोडकरने त्याच्या फेसबूक पेजवर हा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता.


सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा

केतन तिरोडकरने त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर उच्च न्यायालयाविरोधात, त्याच बरोबर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात आक्षेपार्ह मजकूर अपलोड केला होता. जुलै महिन्यात याविषयी तक्रार प्राप्त झाल्यानंतर केतन तिरोडकरविरोधात बीकेसीच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

या प्रकरणाचा तपास करत असणाऱ्या सायब पोलिसांनी या पोस्टची शहानिशा करून गुरुवारी केतन तिरोडकरला अटक केल्याची माहिती दिली आहे. केतन तिरोडकरला भादंवि ५०९, ५०६, ५००, ५०५(२), ५०६(२) माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अटक केल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी केतन तिरोडकरला कोर्टात हजर करण्यात आलं असून ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.



हेही वाचा

कॅन्सर पीडितांना मदत करण्याच्या बहाण्याने महिलेला लाखोंचा गंडा!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा