खारमधील वृद्ध दांपत्याच्या हत्येचा 24 तासात उलगडा

खारमधील वृद्ध दांपत्याच्या हत्येचा उलगडा लावण्यात खार पोलिसांना यश आलं आहे. त्यांच्या घरात काम करणाऱ्या प्रतिभा नावाच्या महिलेने पैशांसाठी प्रियकराच्या मदतीने ही हत्या केल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह राज्याबाहेर पळून गेलेल्या तिच्या प्रियकलाही ताब्यात घेतलं आहे.

खारमधील वृद्ध दांपत्याच्या हत्येचा 24 तासात उलगडा
SHARES

खारमध्ये एकता डिलाईट या इमारतीत राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या हत्येचा उलगडा लावण्यात खार पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी पार्वती खाका (२०), सिंगासन एक्का (२६) या दोघांना नागपूरहून अटक केली आहे. पैशांसाठी  या दोघांनी दाम्पत्याची हातपाय बांधून ओढणीने गळा अावळून हत्या केली. त्यानंतर घरातील मौल्यवान दागिने घेऊन ते दोघे पळून गेले. 


हत्येचा रचला कट

खार पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या एकता डिलाइट इमारतीत पहिल्या मजल्यावर मकिजा हे वृद्ध दाम्पत्य मागील अनेक वर्षाॆपासून राहत होते. त्यांना दोन मुलं असून यातील एक मुलगा व्यवसायाच्या निमित्ताने सिंगापूर आणि दुसरा अमेरिकाला असतो. या दोन्ही वृद्धांच्या देखरेखीसाठी दोन नोकर आहेत. मात्र रात्रीच्या वेळीस त्यांना काही लागल्यास जवळ कुणी नसल्यामुळे त्यांनी १५ दिवसांपूर्वीच पार्वतीला कामावर ठेवलं होतं. 

मूळची ओडिसाची असलेल्या पार्वतीचे एका लग्नात सिंगासन याच्याशी ओळख झाली होती. दोघांमधील मैत्रीचे कालांतराने प्रेमात रुपांतर झाले. दोघांचीही परिस्थिती हालखीची होती. त्यामुळे पैशांची त्यांना नितांत गरज होती.  मुंबईला नोकरीच्या शोधात आलेल्या पार्वतीला मकीजा यांच्या घरी १५ दिवसापूर्वी नोकरी मिळाली. येथील श्रीमंती जवळून पाहिल्याने पार्वतीच्या मनात लालसा निर्माण झाली.  त्यानुसार दोघांनी त्यांच्या एकटेपणाचा फायदा घेत चोरी करण्याचा कट रचला.


हत्येनंतर दोघेही पसार

गुरुवारी रात्री जेवण झाल्यानंतर नानक मकीजा (८५ ) आणि दया मकीजा (८१ ) हे त्यांच्या खोलीत झोपायला गेले होते. त्यावेळी पार्वतीने घराचा  दरवाजा उघडा ठेवला होता. इमारतीचा वाॅचमन रात्री २ वा. साखर झोपेत असताना सिंहासनने मकिजा यांच्या घरात प्रवेश केला. दोघांची गळा आवळून हत्या करत, घरातील १० लाख रुपयांचे मौल्यवान दागिने आणि ९ हजार रोकड घेऊन दोघे पळाले. दादरहून या दोघांनी ओडिसाला जाणारी एक्सप्रेस पकडली होती. सकाळी ९ वा. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशी करत पार्वतीचा फोटो राज्यभरातील पोलिसांना पाठवला. त्यावेळी नागपूर स्थानकावर पार्वतीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेत, खार पोलिसांना कळवले. त्यानुसार खार पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी दोघांचा ताबा घेतला.  त्यांना २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात अाली अाहे. 



हेही वाचा -

खारमध्ये वृद्ध दाम्पत्याची हत्या?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा