७ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून खंडणी


७ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून खंडणी
SHARES

मुंबईतल्या ७ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबियांकडे २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटककेली आहे. रियासुद्दीन अन्सारी असे या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात या पूर्वीच बिहार पोलिसांनी खान मुहंमद अन्सारी, अलाउद्दिन अन्सारी आणि मुस्लिम अन्सारी या आणखी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. रियासुद्दीन या गुन्ह्यानंतर मुंबईला पळून आला होता.

हेही वाचाः-सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल: एक ते दोन दिवसांत निर्णय?
 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असा सामना रंगला होता. त्यावेळी बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांवर सडकून टीका होती. मात्र त्याच पोलिसांकडे आता बिहार पोलिसांनी मदत मागून आरोपीला अटक केली आहे. बिहारच्या चंपारण्या भागातील धनहा येथील एका व्यापाऱ्याच्या ७ वर्षाच्या मुलाचे काही जणांनी अपहरण केले होते. मुलांच्या बदल्यात आरोपींनी त्याच्याकडे २० लाखांची खंडणी मागितली होती. व्यापाऱ्याने या प्रकरणी बिहार पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक दृष्या तपास करून बिहारचे पोलिस अपहरण झालेल्या मुलापर्यंत पोहचले. पोलिसांनी सात वर्षीय मुलाची सुटका करून तीन आरोपींना ताब्यात घेतले.

हेही वाचाः-जी उत्तर विभागातील वरळी परिसर रुग्णसंख्येत शेवटच्या क्रमांकावर

मात्र त्यातील एक आरोपी रियासुद्दीन अन्सारी हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मुंबईला फरार झाला होता. या आरोपीच्या शोधातबिहार पोलिस मुंबईला आले होते. रियासुद्दीन अन्सारी हा मुंबईच्या कांदिवली परिसरात लपला असल्याची माहिती मिळाल्यानंतर बिहार पोलिसांनी कांदिवली पोलिसांची मदत घेत रियासुद्दीन अन्सारीला शोधून काढत, बिहार पोलिसांच्या हवाली केले. बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आरोपी हे कर्जबाजारी झाले होते. त्यांना पैशाची गरज होती. त्यामुळे त्यांनी ही गुन्हा केला होता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा