पैशाच्या व्यवहारातून अल्पवयीन मुलाचे अपहरण


पैशाच्या व्यवहारातून अल्पवयीन मुलाचे अपहरण
SHARES

पैशांच्या व्यवहारातील वादातून नागपाडामध्ये एकाने आपल्या अल्पवयीन मित्राचे अपहरण करून त्याला पिस्तुल दाखवून धमकावल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. समीर सईद कुरेशी (१९), सोनु याकुब कुरेशी (२१) अशी या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- धारावीनंतर दादरमध्येही २४ तासांत कोरोनाचा नवीन रुग्ण नाही

 नागपाडाच्या डिजिटल मार्क कटींग,सय्यद मंझिल मध्ये अल्पवयीन तक्रारदार राहतो. तक्रारदार आणि आरोपींमध्ये काही दिवसांपूर्वी पैशांचे व्यवहार झाले होते. मात्र काही कारणास्तवर अल्पवयीन तक्रारदार आरोपींचे पैसे परत करू शकला नाही. या वरून आरोपींनी २२ डिसेंबर रोजी तक्रारदार दुचाकीहून जात असताना त्याची वाट अडवली. त्यावेळी दोन्ही आरोपींनी गाडीवरून उतरून पैशांची मागणी करत तक्रारदाराला मारहाण केली. त्यानंतर दोघांनी आरोपीला डोंगरीच्या नुरबाग येथे नेले. त्यावेळी सोनुने त्याच्याजवळी पिस्तुलीचा धाक दाखवला. तर समीर आणि फरार आरोपी वासील कुरेशी यांनी त्या ठिकाणीही त्याला मारहाण करून पैसे लवकरात लवकर देण्यासाठी धमकावले.

हेही वाचाः- कांदिवलीतल्या मंदिरात आग, ३ जणांचा मृत्यू

या घटनेनंतर अल्पवयीन तक्रारदार मुलाने डोंगरी पोलिस ठाणे गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगत तक्रार नोंदवली. मुलाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ३६३,३४१,,३४२,३८५,३२३,५०४, ५०६,३४ भा.द.वि कलमांसह गुन्हा नोंदवला. डोंगरी पोलिसांनी हा गुन्हा पुढील तापासासाठी नागपाडा पोलिसांकडे वर्ग केला. नागपाडा पोलिसांनी या गुन्ह्यात आता २ आरोपींना अटक केली आहे. तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.  या प्रकरणी नागपाडा पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा