दुचाकीवर बसलेल्या मांजराची हत्या, माहिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


दुचाकीवर बसलेल्या मांजराची हत्या, माहिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
SHARES

मोटरसायकवर बसल्याच्या रागावरून मांजरीला बांबूच्या सहाय्याने मारहाण करून तिची हत्या केल्याप्रकरणी माहिम पोलिसांनी प्राणी छळ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मांजरीच्या मालकीणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचाः- ठाण्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद, जलवाहिन्यांची तातडीची दुरुस्ती

 माहिम मच्छिमार कॉलनी परिसरात तक्रारदार तेजल हेमचंद्र राऊत(३०) या राहतात. १० वर्षांपासून त्यांच्याकडे कलिको जातीचे मांजर होते. मांजर घरात खाणे-पिणे झाल्यानंतर इमारतीच्या परिसरात फिरत होते. तसेच तेथील पार्कमध्येही कधीकधी जाऊन बसायचे. त्या पार्कमध्ये मोटरसायकल पार्किंग करण्यात येते. २ जानेवारीला हे मांजर नेहमीप्रमाणे घराबाहेर गेले. त्यानंतर ते मृतावस्थेत आढळली. त्यावेळी तेजल यांच्या वडिलांनी चौकशी केली असता इमारतीतील एका महिलेने सांगितले की, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास मांजर पार्कमधील जयंत आरेकर यांच्या मोटरसायकलवर बसली होती. त्यानंतर आरेककर यांनी तिला बांबूने मारहाण केली. त्यावेळी विचारणा केली असता आरेकर यांनी मांजर मोटरसायकलवर बसली असल्यामुळे आपण तिला बांबूने मारल्याचे सांगितले, असे सांगून आरेकर यांनी वा घातला. अखेर तेजय यांनी याप्रकरणी माहिम पोलिस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी भादंवि कलम ४२९ व प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यांच्या कलम ११(१)(अ) अंतर्गत आरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा