गांजा पुडी दिली नाही म्हणून तरुणाची हत्या, काळाचौकीतील घटना

वारंवार मागून ही पटेल गांजाची पुडी देत नसल्यामुळे तिन्ही आरोपींनी त्याला बांबूने मारहाण केली

गांजा पुडी दिली नाही म्हणून तरुणाची हत्या, काळाचौकीतील घटना
SHARES

मुंबईला अंमली पदार्थांचा विळखा पडला आहे की, नशेसाठी तरुण आता टोकाची पाऊले उचलायला लागली आहेत. काळाचौकीत मित्राने गांजाची पुडी दिली नाही म्हणून तिघांनी मित्राला मारहाण करत, त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आमीन पटेल (३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

हेही वाचाः -​पुरुषाच्या 'स्पर्शा'मागचा हेतू स्त्रियांना कळतो : कोर्ट​​​

राज्यातील शाळा - महाविद्यालय परिसरात आमच्या गुप्तचर यंत्रणेच्या पोलिसांकडून लक्ष ठेवले जाते. मात्र, जे ड्रग्ज कुरियर सर्व्हिसच्या मार्फत राज्यात येते, त्यावर आमचे नियंत्रण नसल्याची कबुली गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत देऊन २४ तास उलटत नाही. तोच काळाचौकीत गांजासाठी तरुणाची हत्या त्याच्या मित्रांनी केली. आमीन पटेल आणि बंटी कुमार दास कांबळे हे दोघे मंगळवारी काॅटनग्रीन स्थानकावरील स्काय वाॅकवर उभे होते. त्यावेळी तीन आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी आमीनकडे गांडाची पुडी मागितली. मात्र पटेलने गांडा नसल्याचे सांगितले. 

हेही वाचाः- ​शैक्षणिक सहलींचा एसटी महामंडळाला दिलासा​​​

वारंवार मागून ही पटेल गांजाची पुडी देत नसल्यामुळे तिन्ही आरोपींनी त्याला बांबूने मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत पटेल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी जवळील शासकिय रुग्णालयात नेले. मात्र उपचारा दरम्यान पटेलचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिन्ही आरोपीवर ३०२, ३९७, ३२४, ३४, भा.द.वि अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलिस अधिक तपास करत आहेत.  


संबंधित विषय