COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

पतीच्या हत्येनंतरही पिडीतेची न्यायासाठी वणवण


SHARES

माहिम - माहिमच्या आझादनगर परिसरात मारहाणीत 21 नोव्हेंबरला महादेव भडदाल यांचा मृत्यू झाला. मात्र आजतागायत शाहुनगर पोलिसांनी कुणावरही गुन्हा नोंदवला नसल्याचं समोर येतंय. विशेष म्हणजे पी.एम.रिपोर्टमध्ये मारहाणीचा स्पष्ट उल्लेख असतानाही पोलीस केस नोंदवायला तयार नसल्याचा आरोप भडदाल कुटुंबियांनी केला. मालमत्तेच्या वादातून फेब्रुवारी महिन्यात मृत महादेव भडदाल यांची पत्नी शैला भडदाल यांना याआधी मारहाण झाली होती. या मारहाणीचा गुन्हाही माहिम पोलीस ठाण्यात दाखल आहे. मात्र ही केस मागे घेण्यासाठीच हा हल्ला झाल्याचं शैला भडदाल यांनी म्हटलंय. दरम्यान ‘मुंबई लाइव्ह’नं शाहूनगर पोलिसांशी संपर्क साधला असता, महादेव यांच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा नसून आम्ही डॉक्टरांच्या ओपिनियनसाठी थांबल्याची प्रतिक्रिया दिलीय. डॉक्टरांच्या ओपिनियनला कमीत कमी दोन ते तीन महिने लागणार. मग तोपर्यंत काय? भडदाल कुटुंबियांनी मुंबई पोलीस आयुक्तांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांकडेच मदतीसाठी हात पसरलेत. पण त्यांना अजून न्याय मिळाला नाहीय. त्यामुळे न्याय तरी कुणाकडे मागायचा असा प्रश्न भडदाल कुटुंबाला पडलाय

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा