पाण्याच्या टाकीत पडून चिमुरड्याचा मृत्यू


पाण्याच्या टाकीत पडून चिमुरड्याचा मृत्यू
SHARES

चेंबूरच्या चित्ता कॅम्प येथील नाल्यात पडून ३ वर्षीय एहसान परवेझ तांबोळी याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका मुलाचा शौचालयाच्या वापरासाठी असलेल्या भुमिगत पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आहे. कुणाल बागूल (९) असं या मुलाचं नाव असून तो ठाण्याच्या कळव्यातील महात्मा फुले नगर येथे राहणारा होता.


नेमकं प्रकरण काय?

कळवा पोलिस ठाण्यातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारच्या सुमारास कळव्यातील महात्मा फुले नगर परिसरात कुणाल बागूल हा त्याच्या घराजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ गेला होता. त्यावेळी शौचालयाच्या वापरासाठी असलेल्या भुमिगत पाण्याच्या टाकीतून कुणाल पाणी बाहेर काढत होता. मात्र, टाकीतील पाणी खोलवर गेल्यामुळं पाणी काढत असताना तोल गेल्यामुळे त्याचा टाकीत पडून मृत्यू झाला.

 कुणाल टाकीत पडल्याचं कुणालाच माहित नव्हतं. त्यावेळी येथे साफसफाई करणारा शेशराव विश्वनाथ कांबळे साफसफाई करण्यासाठी त्या टाकीतून पाणी काढायला गेला असता त्याला कुणाल पाण्यात पडला असल्याचं समजलं. पाण्याच्या टाकीला असलेले होल हे दीड बाय दीड फुटांचे अाहे. महात्मा फुले नगर परिसरातील लोक शौचालयासाठी या होलमधून पाणी काढायचे.हेही वाचा - 

अल्पवयीन मुलीशी चाळे, चालक अटकेत

अरमान कोहलीविरोधात प्रेयसीची तक्रार मागेRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा