कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह दाखवण्यासाठी पैसे मागितले, एकाला अटक

कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह दाखवण्यासाठी एका लॅबने एक हजार रुपये मागितल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी सापळा रचून ही घटना उघडकीस आणली आहे.

कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह दाखवण्यासाठी पैसे मागितले, एकाला अटक
SHARES

 राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. अशातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह दाखवण्यासाठी एका लॅबने एक हजार रुपये मागितल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी सापळा रचून ही घटना उघडकीस आणली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

मिरा रोड येथील एसआरएल डायग्नोस्टिक्स लॅबोरेटीजमध्ये कृष्णा सरोज (२६) हा काम करतो. सरोज कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह दाखवण्यासाठी रुग्णांकडून हजार रुपये घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना सापळा रचला. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहा पॉझिटीव्ह रुग्णांचे आधार कार्ड माहिती या लॅबकडे पाठवण्यात आली. सरोज याने संबंधित व्यक्तींकडूं हजार रुपये घेऊन कोणतीही चाचणी न करता कोरोनाचा निगेटीव्ह अहवाल दिला.

या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी कारवाई करून त्याला अटक केली आहे. त्याने आणखी किती लोकांना बनावट कोरोना निगेटीव्ह अहवाल दिले आहेत, याबाबतही पोलीस चौकशी करत आहेत.



हेही वाचा -

नागरिकांनी गर्दी केल्यास अत्यावश्यक सेवाही बंद करा- मुख्यमंत्री

केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा