बंद तिकीट घरामुळे प्रवासी हैराण

 Pali Hill
बंद तिकीट घरामुळे प्रवासी हैराण
बंद तिकीट घरामुळे प्रवासी हैराण
See all

वांद्रे - वांद्रे पूर्व येथील पुलावर असलेले तिकीट घर रात्री 10 वाजताच बंद होते. वांद्रे स्थानकातून रात्री 1.30 वाजेपर्यंत ट्रेन चालत असतानाही तिकीट घर लवकर बंद असल्याने येथून प्रवास करणारे प्रवासी हैराण झाले आहे.

प्रवाशांच्या होत असलेल्या गैरसोयीबाबत मुख्य बुकिंग अधिकारी व्ही. जी. तिवारी यांच्याकडे विचारणा केली असता, येथे लुटालूट होण्याचे प्रकार होतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही हे तिकीटघर लवकर बंद करतो. काही महिन्यांपूर्वीच येथे लूट झाली होती. त्यात बुकिंग ऑफीसमधील रोकड लांबवण्यात आली होती. या घटनेनंतर लुटारूंवर कोणतीच कारवाई झाली नव्हती. मात्र प्रवाशांसाठी दुसरे तिकीट घर सुरू असते. तसेच पूर्व परिसरात खाजगी बुकिंग कार्यालय रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संगनमताने सुरू असून, हे कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने प्रवाशांना येथून तिकीट घ्यावे लागते.

Loading Comments