रात्री दहानंतर वकिलानेच वाजवले फटाके

नायगावच्या भोईवाडा न्यायालयाजवळ एका वकिलाने न्यायालयाचे आदेश धुडकावून लावत फटाके फोडले. त्यामुळे पोलिसांनी संबधित वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर ५ हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे.

SHARE

दिवाळीत रात्री दहानंतर फटाके फोडू नये असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश जारी केले असताना नायगावच्या भोईवाडा परिसरात एका वकिलानेच हे आदेश पायदळी तुडवत फटाके वाजवल्याचं समोर अालं आहे. भोईवाडा पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांवर अशा प्रकारे दंडात्मक कारवाई केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी पोलिसांनी ट्राॅम्बे आणि मरीन ड्राइव्हवर कारवाई केली होती. 


५ हजारांचा दंड

मुंबईच्या परळ परिसरात सर्वाधिक रुग्णालय आणि शाळा असल्याने हा परिसर सायलेन्स झोनमध्ये येतो. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने रात्री दहानंतर फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी आपापल्या परिसरात रात्री दहानंतर गस्त वाढवली अाहे. नायगावच्या भोईवाडा न्यायालयाजवळ एका वकिलाने न्यायालयाचे आदेश धुडकावून लावत फटाके फोडले. त्यामुळे पोलिसांनी संबधित वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर ५ हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे. झोन ४ मधील भोईवाडा पोलिस ठाण्यात ४,  सायन पोलिस ठाण्यात १०, माटुंगा पोलिस ठाण्यात ८ जणांवर पोलिसांनी आतापर्यंत कारवाई केली आहे.   


तक्रारींचा पाऊस

रात्री उशिरापर्यंत फटाके फोडले जात असल्याच्या अनेक तक्रारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे मंगळवारी रात्रभर केल्या जात होत्या. मात्र पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत फटाके वाजवणारे पळून गेलेले असतात किंवा फटाके फोडणे बंद झालेले असते. त्यामुळे कारवाई कोणावर करायची, असा प्रश्न पोलिसांपुढे आहे. विशेष म्हणजे याबाबत पुन्हा तक्रारदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरी प्रतिसाद मिळत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.हेही वाचा - 

सहकारी पतसंस्थेत ८ लाखांचा घोटाळा करणारा अटकेत

डोंगरी बाल सुधारगृहातून तीन मुली पसार
संबंधित विषय
ताज्या बातम्या