गोरेगावमध्ये 5 वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

 Goregaon
गोरेगावमध्ये 5 वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला
गोरेगावमध्ये 5 वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला
See all

गोरेगाव - मुंबईच्या गोरेगाव आरे कॉलनी युनिट नंबर 18 मध्ये सोमवारी रात्री 10 च्या दरम्यान 5 वर्षांच्या एका मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडलीय. मुलगा आपल्या आई- बाबांसोबत घराच्या बाहेर बसला होता. थोड्या वेळासाठी आई-बाबा आपआपल्या कामासाठी म्हणून घरात गेले. तेव्हा मुलगा घराबाहेरच होता. तेव्हा लपून बसलेल्या बिबट्याने त्या मुलावर हल्ला केला. मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच आई-बाबा मुलाकडे धावले. त्यानंतर लगेचच रहिवाशांनी आरडाओरडा करत बिबट्याला पळवून लावले. हल्ल्यात मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. 

बिबट्याच्या हल्ल्यामुळे सध्या परिसरात घबराटीचं वातावरण आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्न गंभीर झाला आहे.

Loading Comments