मुंबई - भारतातील व्यापारी कंपन्यांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांचा परिणाम कंपनीवर कसा होतो आणि हे घोटाळे होऊ नये या संबंधी काय करावे अशा अनेक प्रश्नाबाबत डी लाईट इंडिया कंपनीतर्फे सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेचा अहवाल प्रकाशन सोहळा बुधवारी वरळीतील एका हॉटेलमध्ये करण्यात आला. या सर्व्हे अंतर्गत एकूण 309 विविध उद्योगांमधील सीएसओ, सीईओ आणि सीआयओ अशा विविध अधिकाऱ्यांनी 27 प्रश्नांतर्गत हे सर्वेक्षण केलं. हा सर्व्हे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये करण्यात आला. यामध्ये स्मॉल, मिडिअम, हाय प्रोफाईल या गटांत कंपन्यांची वर्गवारी करण्यात आली होती. 43% हाय प्रोफाईल उद्योग समूह तसेच 20% लहान उद्योग समूह आणि 37% मध्य उद्योग समुहांनी या सर्व्हेमध्ये सहभाग घेतला होता. यात कंपनीतील भ्रष्टाचारामुळे कंपनीच्या ग्रोथवर काय परिणाम होईल? सायबर क्राईम होताना कंपनी अंतर्गत काय परिणाम होतात अशा विविध प्रश्नांवर येथे टक्केवारी नुसार विश्लेषण करण्यात आलं आहे. त्याचबरोबर इ कॉमर्स संदर्भात हे सर्व्हेक्षण होणे गरजेचे होते असंही सांगण्यात आलं. रिपोर्टनुसार कंपनीचा प्रॉफिट घटू शकतो तसेच घोटाळ्यामुळे कंपनीचे नाव सुद्धा धुळीस मिळू शकते. त्यामुळे असे घोटाळे थांबावे यासाठी कंपनी अंतर्गत सुरक्षेचे उपाय होणे गरजेच असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. या प्रकाशन सोहळ्यास डीलाईट इंडियाचे संस्थापक रोहित महाजन आणि लिगल कन्स्लटंट उदय घोसालीया आणि इतर मान्यवर उपस्थित होते.