'दारूड्यांनी वाढवलीय आमची डोकेदुखी', हतबल पोलिसांची व्यथा


'दारूड्यांनी वाढवलीय आमची डोकेदुखी', हतबल पोलिसांची व्यथा
SHARES
महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाने हाहाकार माजवला असताना, संपूर्ण प्रशासन या कोरोनाच्या लढ्यात शर्तीने प्रयत्न करताना दिसत आहे. माञ सर्वात मोठी जबाबदारी पेलावत आहेत ते पोलिस... 24 तास जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांनी आतापर्यंत लाँकडाऊनमध्ये उत्तम रित्य जबाबदारी संभाळली, म्हणूनच की काय कोरोनाचा संसर्ग थोडा का होईना पण कमी झाला, माञ सोमवारी दारूची दुकाने उघडी झाल्याने नागरिकांची दारू खरेदीसाठी झुंबड उडाली, या गर्दीला आवर घालण्याची जबाबदारी ही पोलिसांवर आल्याने पोलिसांवरचा ताण वाढल्याचे सांगितले जात आहे.


मुंबईत सोमवारी दिवसभरात कोरोनाचे 510 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत मृतांची संख्या ही 361 इतकी झाली आहे. परिस्थिती आणखी बिकट होत असताना. या महामारीला पोलिस ही बळी पडत आहेत. आतापर्यंत 422 पोलिस या महामारीने बाधित आहे. दिवसेंदिवस मनुष्यबळ कमी होत असताना, शहरात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. त्यातच सोमवारी सरकारने दारूची दुकाने उघडल्याने नागरिकांनी लांबच लांब रांगा लावून सोशल डिस्टंसिंगची फज्जा उडवला. पोलिसांची ही गर्दी पांगवताना दमछाक पहायला मिळाली. कांदिवलीत एका दारूड्याने आधी नागरिकांवर दगड फेकली, पोलिस आल्यावर त्यांना ही दगडं मारली. अशा प्रकारांमुळे पोलिस दलासह सर्वच ठिकाणाहून सरकारच्या दारूची दुकाने उघडी  करण्याच्या निर्णयावर आता नाराजी व्यक्त केली जात आहे. ' आम्ही ही माणूस आहोत, सरकारच्या आदेशानुसार दिवस राञ जनतेला आवाहन करत घरी राहण्याची विनंती करतो, आतापर्यंत सर्व काही सुरळीत सुरू असताना हा निर्णय घेऊन केलेल्या सर्व मेहनतीवर पाणी सोडले आहे, अशी प्रतिक्रिया पोलिस दलातून उमटत आहेत.

 पोलिसांवरचा ताण वाढला जरी असला, तरी त्यांचे ऐकत कुणीच नाही, अपुरे मनुष्यबळ घेऊन ही पोलिस आपली जबाबदारी चोख पणे बजावत असताना. काही हुल्लडबाजाकडून त्यांच्यावर हल्ल्याचे प्रकार ही घडत आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांवर आतापर्यंत 10 हजाराहून अधिक गुन्हे नोंदवले आहे. माञ बेशिस्तांची संख्या काही कमी होत नाही. वेळीच या सर्वांवर आवर न घातल्यास मेटाकुटीला आलेल्या पोलिसांचे खच्चीकरण होईल, अशा प्रतिक्रीया पोलिस दलातून उमटत आहेत.



मुंबईत उघडण्यात आलेल्या दारूच्या दुकानाबाहेरील गर्दीवर नियंञण ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार

प्रणय अशोक, पोलिस उपायुक्त
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा