'अशी' आहे मतमोजणी केंद्राबाहेर सुरक्षा

तीन टप्यात पोलिसांचा हा बंदोबस्त असून संपूर्ण परिसर हा सीसीटिव्ही कॅमेऱ्यांनी वेढलेला आहे. त्याच बरोबर कार्यकर्त्यांमध्ये कोणताही वाद उद्भवू नये. यासाठी पोलिसांनी प्रत्येक पक्षाच्या कार्यकत्यांना उभे राहण्यासाठी वेगवेगळ्या जागा नेमून दिल्या आहेत.

'अशी' आहे मतमोजणी केंद्राबाहेर सुरक्षा
SHARES

मुंबईत लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ३ टप्यात पोलिसांचा हा बंदोबस्त असून संपूर्ण परिसर सीसीटिव्ही कॅमेऱ्यांनी वेढलेला आहे. त्याच बरोबर कार्यकर्त्यांमध्ये कोणताही वाद उद्भवू नये. यासाठी पोलिसांनी प्रत्येक पक्षाच्या कार्यकत्यांना उभे राहण्यासाठी वेगवेगळ्या जागा नेमून दिल्या आहेत.

मुंबईच्या प्रत्येक मतमोजणी केंद्रावर २ लोकसभा मतदार संघातील मतमोजणी एकाच ठिकाणी घेतली जात आहे. त्यामुळे मतमोजणी केंद्राबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तर दुसऱ्या टप्यात राज्य राखीव पोलिस दलाचे जवान मतमोजणी केंद्राबाहेर तैनात करण्यात आले आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्यात मुंबई पोलिस दलाचे कर्मचारी मतमोजणी केंद्रावर तैनात करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्रावर कुणालाही मोबाइल फोन नेण्यावर पोलिसांनी बंदी घालण्यात आली आहे.

त्याच बरोबर मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची होणारी गर्दी लक्षात घेता. त्या ठिकाणी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये. या दृष्टीकोनातून प्रत्येक उमेदवाराच्या कार्यकर्त्याला उभे राहण्यासाठी वेगवेगळी जागा नेमून देण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राचा संपूर्ण परिसर सीसीटिव्ही कॅमेऱ्यांनी सज्ज आहे. त्याचबरोबर साध्या वेशातील पोलिसही तैनात आहे. मोबाइलद्वारे पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर सायबर पोलिस लक्ष ठेवून असल्याची माहिती पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली.



हेही वाचा-

मुंबईत कोण बाजी मारणार?

देशात कुणाचं सरकार येणार? भाजपा की काँग्रेस?



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा