गर्भवती महिलेचा पाठलाग करणारा अटकेत


गर्भवती महिलेचा पाठलाग करणारा अटकेत
SHARES

गर्भवती महिलेची छेड काढून तिचा पाठलाग करणाऱ्या आरोपीला लोकमान्य टिळक पोलिसांनी अटक केली आहे. मिराज हुसेन सिराज अहमद असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी सिराज विरोधात ३५४ (ड) कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २१ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.


संपूर्ण प्रकार

पीडित महिला ही गर्भवती असल्यामुळे माहेरी आली होती. पीडित महिला ही गर्भवती असल्यामुळे दररोज चालण्यासाठी सकाळी ७ वा. जे.एस.एस.के रोड ते कोलबाट लेट या कमी वर्दळीच्या ठिकाणी येत असे. १६ सप्टेंबर रोजी ती नेहमीप्रमाणे आते भाऊ संजय ओव्हळ याच्यासोबत माॅर्निंग वाॅकसाठी आली होती. त्यावेळी सिराज नेहमीप्रमाणे तिचा पाठलाग करत होता.

काही अंतरावर गेल्यानंतर त्याने महिलेला मागून हाक मारण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने पीडितेचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडितेने आरडाओरड केल्यानंतर पुढे चालत असलेल्या आतेभाऊ संजयने त्याला पकडलं. तोपर्यंत परिसरातील इतर नागरिकही संजयच्या मदतीस धावून आले.


आरोपीला पोलिस कोठडी

नागरिकांनी त्यावेळी सिराजला लोकमान्य टिळक पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिसांनी सिराज विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा