संशयित खलिस्तानी दहशतवाद्याला अटक

पंजाबच्या रोपर जिल्ह्यातील रहिवासी असलेला हरपाल सध्या कर्नाटकातील बेल्लारीत वास्तव्याला होता. २ डिसेंबरला पुण्यातील चाकण परिसरात एक व्यक्ती अनधिकृत शस्त्रांसह येणार असल्याची माहिती एटीएसच्या पुणे कक्षाला मिळाली होती. त्यानुसार एटीएसच्या पथकाने पुण्याला जाऊन सापळा रचला आणि संशयिताला ताब्यात घेतलं.

संशयित खलिस्तानी दहशतवाद्याला अटक
SHARES

पुण्यात शस्त्रांची तस्करी करण्यासाठी आलेल्या संशयीत खलिस्तानी दहशतवाद्याला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथका (एटीएस)ने अटक केली आहे. हरपाल सिंग नागरा उर्फ नाईक (४२) असं या आरोपीचं नाव आहे. हरपालच्या चौकशीतून पोलिसांनी आरोपींच्या साथीदाराला पंजाबमधील सरहद इथून अटक केल्याची माहिती एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.


'असं' घेतलं ताब्यात

पंजाबच्या रोपर जिल्ह्यातील रहिवासी असलेला हरपाल सध्या कर्नाटकातील बेल्लारीत वास्तव्याला होता. २ डिसेंबरला पुण्यातील चाकण परिसरात एक व्यक्ती अनधिकृत शस्त्रांसह येणार असल्याची माहिती एटीएसच्या पुणे कक्षाला मिळाली होती. त्यानुसार एटीएसच्या पथकाने पुण्याला जाऊन सापळा रचला आणि संशयिताला ताब्यात घेतलं. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचं पिस्तुल आणि ५ राऊंड सापडले.


दहशतवाद्यांच्या संपर्कात

त्याच्याविरुद्ध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर एटीएसने याप्रकरणी अधिक तपास सुरू केला. तेव्हा हरपाल सिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी शस्त्रास्त्रं जमा करणे तसंच तरूणांची माथी भडकावण्याचं काम करत असल्याचं निष्पन्न झालं. हरपाल सिंग स्वतंत्र खलिस्तान विचारसरणीचा पुरस्कर्ता असून तो भारताविरूद्ध कारवाई करणाऱ्या तसंच पाकिस्तानी दहशतवादी संघटनांमधील विविध सदस्यांच्या संपर्कात असल्याचं निष्पन्न झालं आहे.


साथीदाराला अटक

याप्रकरणी हरपाल सिंगवर 'यूएपीए' कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला या प्रकरणी १७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून त्याच्या एका साथीदाराला पंजाब येथील सरहद पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आले आहे.हेही वाचा-

हिरे व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी चालकाला अटक

मुंबईत अवघ्या ३ मिनिटांत जाते कार चोरीलासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा