वैभवच्या ट्विटर अकाऊंटहूनही संशयास्पद संदेश


वैभवच्या ट्विटर अकाऊंटहूनही संशयास्पद संदेश
SHARES

मराठा आरक्षणावरून सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात असताना सनातन संस्थेचा तथाकथित साधक वैभव राऊत देखील मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत असल्याचं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून पुढे आलं आहे.


सोशल मीडियावर नजर

राज्यात घातपाती कारवाईच्या प्रयत्नात असलेल्या वैभवसह त्याच्ये इतर २ सहकारी शरद आणि सुधन्वा यांच्या सोशल मीडियाद्वारे संपर्कात असलेल्या व्यक्तींवर पोलिसांनी नजर वळवली आहेत. या तपासातून वैभवच्या ट्विटर अकाऊंटवर काही संशयास्पद संदेश पोलिसांना दिसून आले आहेत. या मजकूरात वैभवने मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात लिहिलेल्या मजकूरने पोलिसांच्या ही भुवया उंचावल्या आहेत.काय लिहिलंय अकाऊंटवर

२६ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरचा अपघात झाला होता. या अपघातात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोडक्यात बचावले. त्याबाबत वैभवने त्याच्या ट्विटर हँडलहून " मुख्यमंत्रीसाहेब कालच्या घटनेतून तुम्ही सुखरूप निघालत, देवाची कृपा. पण काल अमावस्या होती. साहेब जरा दिवस बघून दौरे करा" असे लिहिल्याचं आढळून आलं आहे.


अकाऊंटचा वापर

त्याचबरोबर सनातन संस्थेसंबधित अनेक घटनांचा मजकूरही त्याने रिट्विट केला होता. त्याच्या या सर्व घटना संशयास्पद वाटत असल्याने त्या मागेही त्याचा काही हेतू आहे का? हे अकाऊंट तोच वापरत आहे का? की कुणी दुसरे त्याच्या नावाने चालवत आहे हे देखील तपासणार असल्याचं महाराष्ट्र एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितलं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा