महाराष्ट्रात बलात्कारासह हत्येचे सर्वाधिक गुन्हे

महाराष्ट्रात महिलांविरोधात ३७ हजार १४४ गुन्हे घडले. त्याबाबत राज्य देशात तिस-या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रात बलात्कारासह हत्येचे सर्वाधिक गुन्हे
SHARES

उत्तरप्रदेशच्या हाथरत सामुहिक बलात्कारानं संपूर्ण देशाला हादरून सोडलं आहे. या घटनेनंनतर विविध राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या गुन्ह्यांवर नजर टाकल्यास अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पहिला असल्याची धक्कादायक माहिती नॅशनल क्राइम रेकाँर्डमध्ये दिलेल्या माहितीतून पुढे येत आहे.   

हेही वाचाः- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आरे आंदोलकांवरील आरोप मागे घेण्याचे निर्देश

२०१९ मध्ये  देशात बलात्कारासह हत्येचे सर्वाधिक गुन्हे म्हणजे ४७ महाराष्ट्रात घडले आहेत. राज्यापाठोपाठ मध्य प्रदेशात (३७) बलात्कारासह हत्येचा गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशात ३४ बलात्कारासह हत्येचा गुन्हा दाखल झाले होते. महाराष्ट्रात  महिलांविरोधात ३७ हजार १४४ गुन्हे घडले. त्याबाबत राज्य देशात तिस-या क्रमांकावर आहे. महिलांविरोधात सर्वाधिक गुन्हे उत्तरप्रदेशात(५९८५३) व राजस्थान(४१५५०) घडले आहेत. गंभीर बाब म्हणजे बलात्काराच्या घटनांचा विचार केला, तर राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. राजस्थानात सर्वाधीक म्हणजे ५९९७ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश(३०६५) व मध्यप्रदेशात(२४८५) सर्वाधीत बलात्काराचे गुन्हे दाखल झाले होते. महाराष्ट्र बलात्कााराच्या गुन्ह्यांबाबत देशात चौथ्या क्रमांकावर आहेत. राज्यात २२९९ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले होते. राज्यापाठोपाठ केरळमध्ये २०२३ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत.

हेही वाचाः- चेंबूरमध्ये मेट्रो ४ लाईनसाठी १८ झाडं तोडण्यास महापालिकेची परवानगी

मुंबई ज्येष्ठ नागरीकांविरोधात घडले सर्वाधिक गुन्हे 

देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत ज्येष्ठ नागरिकांविरोधात सर्वाधीक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. २०१७ पासून याबाबत मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. २०१९ मध्ये ज्येष्ठ नागरीकांविरोधात १२३१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्या पाठोपाठ दिल्ली(१०७६), अहमदाबाद (७९४) व चेन्नईचा(५५२) क्रमांक लागतो. त्यातील बहुतांश गुन्हे मालमत्तेशी संबंधीत आहेत. बहुतांश गुन्ह्यांमध्ये ज्येष्ठ नागरीकांची फसवणूक अथवा लुट करण्यात आली आहे. राज्यही याबाबत देशात आघाडीवर आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा