हुक्का पार्लर सुरू असलेल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अधिकाऱ्यावर कारवाई करणार- अनिल देशमुख

राज्यात ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल तेथील संबंधित पोलीस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितलं.

हुक्का पार्लर सुरू असलेल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अधिकाऱ्यावर कारवाई करणार- अनिल देशमुख
SHARES

राज्यात ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल तेथील संबंधित पोलीस अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितलं. विधानपरिषद सदस्य रवींद्र फाटक व महादेव जानकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

राज्यात ज्या-ज्या ठिकाणी अंमली पदार्थांची खरेदी-विक्री होत असेल त्या ठिकाणी दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असं सांगून गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने ११ ठिकाणी छापे टाकले असून ४२ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.

वरळी येथील पबमध्ये झालेली गर्दी व कोरोनाच्या नियमांचं झालेलं उल्लंघन याबाबत दोन दिवसांत चौकशी करण्यात येईल व त्याचा अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं.

रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी गर्दीमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत लावलेली उपस्थिती व तिथं कोरोना नियमांचं (coronavirus) झालेलं उल्लंघन यासंदर्भात चालू अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असंही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानपरिषद सदस्य रामदास कदम, भाई जगताप, भाई गिरकर, निरंजन डावखरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

(maharashtra home minister anil deshmukh on illegal hookah parlours in maharashtra)


हेही वाचा-

नायर रुग्णालयातील तरुण डॉक्टरच्या आत्महत्येचं गूढ उकललं

“मुंबई काळोखात बुडण्यासाठी 'हेच' जबाबदार, चिनी सायबर हल्ल्याचा दावा खोटा”


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा