Advertisement

“मुंबई काळोखात बुडण्यासाठी 'हेच' जबाबदार, चिनी सायबर हल्ल्याचा दावा खोटा”

केवळ ऊर्जाखात्यातील अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आणि समन्वयाच्या अभावामुळे १२ ऑक्टोबर २०२० रोजी संपूर्ण मुंबई काळोखात बुडाली, असा दावा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

“मुंबई काळोखात बुडण्यासाठी 'हेच' जबाबदार, चिनी सायबर हल्ल्याचा दावा खोटा”
SHARES

केवळ ऊर्जाखात्यातील अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आणि समन्वयाच्या अभावामुळे १२ ऑक्टोबर २०२० रोजी संपूर्ण मुंबई काळोखात बुडाली. मात्र, आपलं अपयश झाकण्यासाठी गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री नवीन शक्कल लढवत आहेत, असा दावा करत माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला.

नागपूरमधील पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईतील वीज खंडित प्रकरणी ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले.

गेल्यावर्षी १२ ऑक्टोबर २०१९ रोजी मुंबईत झालेल्या वीजपुरवठा खंडित प्रकरणी महाराष्ट्र सायबरने केलेल्या तपासाचा अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सह्याद्री अतिथीगृह इथं ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (nitin raut) यांना नुकताच सोपवला. 

मुंबईत वीजपुरवठा खंडित झाल्याच्या प्रकरणी घातपाताच्या शक्यतेच्या दृष्टीकोनातून तपास करणं आवश्यक वाटल्याने ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी या प्रकरणाच्या अधिक तपासाबाबत त्यावेळी विनंती केली होती. त्यानुसार या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश महाराष्ट्र सायबर विभागाला देण्यात आले होते. रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क ॲनॅलिसिस या अमेरिकन कंपनीने २८ फेब्रुवारी रोजी एक अहवाल जारी केला. या अहवालात त्यांनी असं म्हटलं आहे की, मुंबईच्या इलेक्ट्रीकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चीन देशाने मालवेअर (व्हायरस) टाकला असल्याची शक्यता आहे. अशाच प्रकारची बातमी १ मार्च रोजी न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्रातही तसंच वॉलस्ट्रीट जर्नल मध्येही प्रसिद्ध झाली आहे, अशी माहिती अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी यावेळी दिली.

त्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,  वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार पूर्णत: मानवनिर्मित आहे. यात कोणत्याही देशाचा संबंध नाही. १२ ऑक्टोबर २०२० रोजी संपूर्ण मुंबई काळोखात बुडाली, ती केवळ ऊर्जाखात्यातील अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आणि समन्वयाच्या अभावामुळे. मात्र, हे अपयश झाकण्यासाठी गृहमंत्र्यांनी आणि ऊर्जामंत्र्यांनी नवीन शक्कल लढवत चीनच्या सायबर हल्ल्याचं कारण देत जनतेची दिशाभूल करणं सुरू केलं आहे. 

हेही वाचा- मुंबईतील ‘बत्ती गुल’ मागे चीनचा हात?, ऊर्जामंत्र्यांनीही व्यक्त केला संशय

एका वृत्ताच्या आधारावर एखादा आयपीएस अधिकारी अहवाल तयार करतो. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप असल्याचं नमूद केलं जातं. अशा महत्त्वाच्या अहवालाची कोणतीही खातरजमा न करता राज्याचे गृहमंत्री थेट पत्रकार परिषद घेऊन आपली जबाबदारी झटकताहेत, हे अत्यंत गंभीर आहे. जर या घटनेत एखाद्या देशाचा संबंध असेल तर राज्याने हा विषय केंद्र सरकार समोर का मांडला नाही? परराष्ट्र खातं आणि संरक्षण खात्यासमोर हा विषय मांडणं राज्य सरकारला महत्त्वाचं वाटलं नाही, याचं आश्चर्य वाटतं, असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी उपस्थित केला. 

मुंबईत वीज पुरवठा खंडित होण्याआधी दोन वाहिन्या १० ऑक्टोबर रोजीच बंद होत्या. त्यामुळे १२ तारखेला तिसऱ्या वाहिनीवर भार आल्याने ती बंद पडली. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी चौथ्या वाहिनीचा आधार घेतल्यावर अनेक ठिकाणी ठिणग्या उडू लागल्या. तत्काळ वीज पुरवठा बंद करण्यात आला. या सर्व माहितीची नोंद आहे. यात सायबर हल्ल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा प्रकारचा हल्ला होऊ शकेल इतकी अत्याधुनिक वा सक्षम वीज यंत्रणा नसल्याचा दावाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

(bjp leader chandrashekhar bawankule alleges MVA government for electricity failure in mumbai)

हेही वाचा- मुंबईतील वीजपुरवठा खंडित प्रकरणी महाराष्ट्र सायबरचा अहवाल सादर


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा