Advertisement

मुंबईतील वीजपुरवठा खंडित प्रकरणी महाराष्ट्र सायबरचा अहवाल सादर

गेल्यावर्षी १२ ऑक्टोबर २०१९ रोजी मुंबईत झालेल्या वीजपुरवठा खंडित प्रकरणी महाराष्ट्र सायबरने केलेल्या तपासाचा अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सह्याद्री अतिथीगृह इथं ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना सोपवला.

मुंबईतील वीजपुरवठा खंडित प्रकरणी महाराष्ट्र सायबरचा अहवाल सादर
SHARES

गेल्यावर्षी १२ ऑक्टोबर २०१९ रोजी मुंबईत झालेल्या वीजपुरवठा खंडित प्रकरणी महाराष्ट्र सायबरने केलेल्या तपासाचा अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सह्याद्री अतिथीगृह इथं ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना सोपवला. 

यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) म्हणाले की, रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क ॲनॅलिसिस या अमेरिकन कंपनीने २८ फेब्रुवारी रोजी एक अहवाल जारी केला. या अहवालात त्यांनी असं म्हटलं आहे की, मुंबईच्या इलेक्ट्रीकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चीन देशाने मालवेअर (व्हायरस) टाकला असल्याची शक्यता आहे. अशाच प्रकारची बातमी १ मार्च रोजी न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्रातही तसंच वॉलस्ट्रीट जर्नल मध्येही प्रसिद्ध झाली आहे.

मुंबईत वीजपुरवठा खंडित प्रकरणी ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी या प्रकरणाच्या अधिक तपासाबाबत त्यावेळी विनंती केली होती. त्यानुसार या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश महाराष्ट्र सायबर विभागाला देण्यात आले होते. 

हेही वाचा- मुंबईतील ‘बत्ती गुल’ मागे चीनचा हात?, ऊर्जामंत्र्यांनीही व्यक्त केला संशय

ऊर्जामंत्री डॉ.राऊत (nitin raut) यांनी सांगितलं की, १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाल्याच्या प्रकरणी घातपाताच्या शक्यतेच्या दृष्टीकोनातून तपास करणं आवश्यक वाटल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तपासाबाबत विनंती केली होती. तसंच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, ऊर्जा विभागाने याप्रकरणी गठित केलेल्या तांत्रिक तपास समिती आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरणाकडून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्र सायबरचा अहवालही प्राप्त झाला आहे. विधानमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे या अहवालांच्या अनुषंगाने अधिक माहिती विधानमंडळात सादर केली जाईल.

पत्रकार परिषदेला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महाराष्ट्र सायबरचे पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव आदी उपस्थित होते.

भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये सीमेजवळ जोरदार संघर्ष सुरु असतानाच चीनने हा सायबर हल्ला केला होता. भारतामधील वीजपुरवठा सुरळीत चालवण्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरलं जातं. ते हॅक करून चीनमधील हॅकर्सने त्यात मालवेअर व्हायरस टाकला होता. या मालवेअरचा शोध ‘रेकॉर्डेड फ्युचर’ या सायबर सिक्युरिटी कंपनीने घेतला आहे. रेकॉर्डेड फ्युचरचे कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट सोलेमॉन यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सरकार पुरस्कृत रेडइको कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतामध्ये वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेमधील एक डझनहून अधिक ठिकाणी घुसखोरी केली. या सायबर हल्ल्यामुळे संपूर्ण मुंबई काळोखात गेली होती.

(mumbai police cyber report present on electricity failure after system hack by china)

संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा