Advertisement

मुंबईतील ‘बत्ती गुल’ मागे चीनचा हात?, ऊर्जामंत्र्यांनीही व्यक्त केला संशय

प्रसारमाध्यमांच्या या दाव्यात तथ्य असल्याचं मोठं वक्तव्य राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे.

मुंबईतील ‘बत्ती गुल’ मागे चीनचा हात?, ऊर्जामंत्र्यांनीही व्यक्त केला संशय
SHARES

मुंबईत गेल्या वर्षी म्हणजे १२ ऑक्टोबर २०२० मध्ये पूर्ण शहराचा वीज पुरवठा काही तास खंडित झाला होता. चीनमधून झालेल्या सायबर हल्ल्यामुळे ही घटना घडल्याचा दावा अमेरिकेतील द न्यू यॉर्क टाइम्सने केला आहे. तसंच वृत्त याआधी इंडिया टुडेने देखील दिलं होतं. प्रसारमाध्यमांच्या या दाव्यात तथ्य असल्याचं मोठं वक्तव्य राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे.   

मुंबईत बऱ्याच वेळासाठी वीज गेली, तेव्हाच मी म्हणालो होतो की काहीतरी चुकीचं घडत आहे. त्यावेळी ताबडतोड मी ३ सदस्यांची समिती या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमली. आता माध्यमांमधून जे दावे केले जात आहेत, त्यात तथ्य असल्याचं मला वाटतं आहे. यासंदर्भातील अहवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्याकडे सादर करणार आहे. त्यानंतर सत्य समोर येईल, अशी मला अपेक्षा आहे, असं वक्तव्य नितीन राऊत यांनी केलं आहे.

हेही वाचा- मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे चीनचा हात, न्यूयॉर्क टाइम्सचा दावा

भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये सीमेजवळ जोरदार संघर्ष सुरु असतानाच चीनने हा सायबर हल्ला केला होता. भारतामधील वीजपुरवठा सुरळीत चालवण्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरलं जातं. ते हॅक करून चीनमधील हॅकर्सने त्यात मालवेअर व्हायरस टाकला होता. या मालवेअरचा शोध ‘रेकॉर्डेड फ्युचर’ या सायबर सिक्युरिटी कंपनीने घेतला आहे. रेकॉर्डेड फ्युचरचे कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट सोलेमॉन यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सरकार पुरस्कृत रेडइको कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतामध्ये वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेमधील एक डझनहून अधिक ठिकाणी घुसखोरी केली. या सायबर हल्ल्यामुळे संपूर्ण मुंबई काळोखात गेली होती.

एकाच वेळी संपूर्ण मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्याचा हा प्रकार आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकार असल्याचं म्हटलं जातं. यामुळे मुंबईतील हाॅस्पीटल, लोकल ट्रेनपासून इतर सर्वच अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्या होत्या. तर महाराष्ट्र पोलिसांच्या साबयर विभागाने मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे मालवेअरच्या माध्यमातून केलेल्या सायबर हल्ल्याची शक्यता व्यक्त केल्याचं वृत्त इंडिया टुडे ने दिलं होतं.

(maharashtra energy minister nitin raut reacts on china cyber attack on mumbai electricity)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा