Advertisement

मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे चीनचा हात, न्यूयॉर्क टाइम्सचा दावा

१२ ऑक्टोंबर २०२० रोजी सकाळी मुंबईतील वीज पुरवठा अचानक खंडित झाला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली. कधीच न थांबणारी मुंबई या दिवशी थांबली.

मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे चीनचा हात, न्यूयॉर्क टाइम्सचा दावा
SHARES

मुंबईमध्ये मागील वर्षी १२ ऑक्टोबर रोजी वीज पुरवठा खंडित झाला होता. यामागे चीनचा हात असल्याची शक्यता व्यक्त असल्याचा दावा अमेरिकीची वृत्तसंस्था न्यूयॉर्क टाईम्सने केला आहे.  

१२ ऑक्टोंबर २०२० रोजी सकाळी मुंबईतील वीज पुरवठा अचानक खंडित झाला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली. कधीच न थांबणारी मुंबई या दिवशी थांबली. वीज गेल्यामुळे कोरोनाशी लढणाऱ्या हॉस्पिटलमधील वेंटिलेटर्संनी काम करणं बंद केलं. ऑफिसमधील वीज गेली. दोन तासांच्या प्रयत्नानंतर वीज पुरवठा पुन्हा सुरळीत होऊ शकला होता. हा वीजपुरवठा खंडीत होण्याचा घटना ही अनेक दशकांमधील सर्वात मोठी आहे. या घटनेची थेट संबंध भारत आणि चीनदरम्यान गलवानच्या खोऱ्यात सुरु असणाऱ्या संघर्षाशी असल्याचं सांगण्यात येत आहे. 

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये सीमेजवळ जोरदार संघर्ष सुरु असतानाच चीनने हा सायबर हल्ला केला. भारतामधील वीजपुरवठा सुरळीत चालवण्यासाठी ज्या सॉफ्टवेअर आणि सिस्टीमचा वापर केला जातो त्यामध्ये चीनमधील हॅकर्सने याच भारत चीन संघर्षाच्या काळात मालवेअर इंजेक्ट केला. चीनच्या हॅकर्स सैन्याने ऑक्टोबरमध्ये केवळ पाच दिवसांमध्ये भारतात पॉवर ग्रीड, आयटी कंपन्या आणि बँकिंग सेक्टर्सवर ४०,५०० वेळा हल्ला केला. 

चीन दाखवू पाहत होता की सीमेवर त्यांच्या विरोधात कारवाई केली तर ते भारतातील वेगवेगळ्या पॉवर ग्रीडवर मालवेयर हल्ला करुन त्यांना बंद करु शकते. चिनी मालवेयर भारतातील वीज पुरवठा नियंत्रित करणाऱ्या प्रणालीमध्ये घुसला होता. यामध्ये हाय वोल्टेज ट्रान्समिशन सबस्टेशन आणि थर्मल प्लँट यांचाही समावेश होता. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा