बेकायदेशीररित्या जमलेल्या 'त्या' जमावा विरोधात गुुन्हा दाखल


बेकायदेशीररित्या जमलेल्या 'त्या' जमावा विरोधात गुुन्हा दाखल
SHARES

मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध करत मंगळवारी दुपारी मोठी गर्दी केली. आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर आज दुपारी वांद्रे पश्चिम परिसरात स्टेशनबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. अखेर पोलिसांना लाठीचार्जकरून जमाव पांगवावा लागला. या बेकायदेशीररित्या जमलेल्या जमावावर  वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली.




 देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिस्थिती नियंञणात आणण्याच्या हेतूने लाँकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला. त्यामुळे 14 एप्रिल रोजी लाँकडाऊननंतर गावी जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या असंख्य कामगार रस्त्यावर उतरले. लाँकडाऊनमुळे हातात काम नाही, जेवणाचे वांदे, त्यामुळेच  गावाकडे परत जाण्यासाठी रेल्वेगाडीची मागणी हे कामगार करत होते. त्यातच कुणी तरी 14 एप्रिलला लाँकडाऊन संपल्यानंतर उत्तरभारतात विशेष गाडी पाठवणार असल्याची अफवा पसरवली. माञ ती अफवा असल्याचे कळाल्यानंतर असंख्य कामगार वांद्रे बस डेपो येथे जमा झाले.


आम्हाला आमच्या घरी सोडा अशी येथे जमलेल्या नागरिकांची, मजुरांची मागणी होती. याठिकाणी जमलेले जास्तीत जास्त लोक कामानिमित्त उत्तर प्रदेश आणि बिहार येथून मुंबईत आलेले आहेत. वांद्रेत येथील परिस्थिती चिघळल्याचं दिसताच, गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही गर्दी याठिकाणी कशी जमली याची चौकशी करण्याचे आदेश गृहमंञी अनिल देशमुख यांनी दिल्यानंतर या जमावा विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात 143,147,149, 186,188 भा.द.वि कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर सोशल मिडियावर प्रक्षोभक भाषण करत, अफवा पसरवण्याच्या आरोपाखाली विनय दुबे या उत्तर भारतीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा