मालवणी विषारी दारू कांड, मुख्य आरोपीला दोन वर्षांनी अटक

  Mumbai
  मालवणी विषारी दारू कांड, मुख्य आरोपीला दोन वर्षांनी अटक
  मुंबई  -  

  मालवणी विषारी दारू कांडातील मुख्य आरोपी धर्मेंद्रसिंह तोमर उर्फ संजयसिंह याला तब्बल दोन वर्षांनी अटक करण्यात आली आहे. शीळडायघर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या अवैध दारूविक्री प्रकरणी धर्मेंद्रसिंह तोमर ठाणे पोलिसांच्या रडारवर होता. तो मध्य प्रदेशमध्ये इंदौरच्या राजेंद्रनगर येथे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. त्यानंतर इंदौरला पथक पाठवून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे.

  जून 2015 मध्ये मुंबईच्या मालवणी परिसरात दारूकांड झाले होते. जिथे विषारी देशी दारू पिऊन 104 हून अधिक जण मरण पावले होते, तर कित्येकजण अपंग देखील झाले होते. विशेष म्हणजे ही विषारी दारू बनवण्यासाठी खाण्यायोग्य असलेल्या इथेनॉलच्या जागी चक्क मिथेनॉल या केमिकलचा वापर झाला होता. त्यातून 104 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखा कक्ष 11 ने देशी दारू विकाणाऱ्या दलालासह कित्येकांना अटक केली होती. पण मुख्य आरोपी धर्मेंद्रसिंह तोमर मात्र फरार होता.

  धर्मेंद्रसिंह तोमर हा एक सराइत गुन्हेगार असून तो हाय-वेवर दरोडे टाकण्यात पटाईट आहे. हायवेवरून जाणारे ट्रकच्या ट्रक हा धर्मेंद्रसिंह तोमर चोरत असे आणि त्यानंतर सगळा माल विकत असे. जून महिन्यात अशाच प्रकारे त्याने एका औद्योगिक केमिकल नेणाऱ्या ट्रकवर दारोडा टाकला आणि त्यातील विषारी मिथेनॉल हे इथेनॉलच्या नावाखाली विकले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.