COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
40,162
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

उत्तराखंडच्या माजी उपमुख्यमंत्र्याला धमकी देणाऱ्यास अटक


उत्तराखंडच्या माजी उपमुख्यमंत्र्याला धमकी देणाऱ्यास अटक
SHARES

झारखंडचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे आमदार सुदेशकुमार महातो यांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणाला आज मुंबईतून अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या नेतृत्वाखाली एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.  मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शिवाजीनगर परिसरातून या आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचाः- ठाण्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद, जलवाहिन्यांची तातडीची दुरुस्ती

 आमदार सुदेशकुमार महातो यांच्याकडे १५ लाखांची खंडणी आरोपीने मागितली होती. पैसे न दिल्यास गोळी मारण्याची धमकी त्याने दिली होती. अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या आरोपीचं नाव निलेश कमलेश पांडे (२५) असे असून हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान बड्या नेत्यांना फोन करून धमकी देण्याचा दिवसभरातील हा दुसरा प्रकार आहे. गुरूवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना देखील एका अनोळखी फोनवरून धमकवण्यात आलं होतं. या प्रकऱणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुजरातमध्ये एकाला अटक केली आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा