मालेगाव बाॅम्बस्फोटातील आरोपीला पाहिजे सुरक्षा, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

सध्या जामीनावर बाहेर असलेला मालेगाव बाॅम्बस्फोटातील आरोपी समीर कुलकर्णी याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली आहे. २००८ मध्ये झालेल्या मालेगाव स्फोटाप्रकरणी कुलकर्णीला अटक करण्यात आली होती.

मालेगाव बाॅम्बस्फोटातील आरोपीला पाहिजे सुरक्षा, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र
SHARES

सध्या जामीनावर बाहेर असलेला मालेगाव बाॅम्बस्फोटातील आरोपी समीर कुलकर्णी याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली आहे. २००८ मध्ये झालेल्या मालेगाव स्फोटाप्रकरणी कुलकर्णीला अटक करण्यात आली होती. मात्र त्याला आॅक्टोबर २०१७ मध्ये जामीनावर सोडण्यात आलं.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात समीरने आपल्याला कोणाकडून धमकी मिळाली हे स्पष्ट केलेलं नसलं, तरी ताबडतोब सुरक्षा मिळण्याची विनंती त्याने पत्रात केली आहे.   


कोण आहे समीर?

समीरची भोपाळमध्ये प्रिंटिंग प्रेस असून मालेगाव स्फोटात वापरलेल्या बॉम्बसाठी त्यानं केमिकल पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. इंदूर आणि भोपाळमध्ये झालेल्या स्फोटांच्या कटातही तो सामील असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 


काय आहे प्रकरण?

मालेगावात सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या दुचाकी बॉम्बस्फोटामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए)च्या विशेष न्यायालयाने ९ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर ५० हजारांच्या जामीनावर समीरला सोडलं. सोबतच साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित आणि मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय यांनाही जामीन मिळाला आहे. 



हेही वाचा-

मी भारतात परतण्यास तयार, पण एका अटीवर- झाकीर नाईक

बलात्कार पीडितेसोबत केलं लग्न, हायकोर्टाने रद्द केला गुन्हा



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा