९३ स्फोटातील मुख्य आरोपीची कब्र विकली, एकाला अटक

याकुब मेमन व मेमन कुटुंबियांशी संबंधीत आणखी तीन कब्रची जागा मर्चंट कुटुंबियांना दिली. त्या बदल्यात तीन लाख रुपये घेतले होते. मात्र या व्यवहाराची कोणतिही पावती त्याने मेमन कुटुंबियांना दिली नव्हती.

९३ स्फोटातील मुख्य आरोपीची कब्र विकली, एकाला अटक
SHARES

मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बाॅम्ब स्फोट एकमेव फाशी देण्यात आलेला आरोपी याकुब अब्दुल्ल रज्जाक मेमन याची कबर विकल्याची धक्कादायक माहीत समोर आली आहे. या प्रकरणी एल.टी.मार्ग पोलिसांनी परवेज इस्माईल सरकारे (५४)या आरोपीला अटक केली आहे. परवेज हा कब्रिस्तानचा ट्रस्टी असताना. त्याने बेकायदेशीर रित्या मेमनला दफन केलेला ओटा विकल्याचा आरोप मेमनच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- कल्याण डोंबिवलीत ४५८ नवीन रुग्ण, ६ जणांचा मृत्यू

मुंबईत १९९३ च्या साखळी बाॅम्ब स्फोटामागे दाऊद आणि टायगर मेमन याचा हात होता. याकबू हा टायगर मेमनचा भाऊ असून त्याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निश्चित झाल्यानंतर त्याला जुलै २०१५ मध्ये फाशी देण्यात आली होती. त्यावेळी त्याचा मृतदेह मरीन लाईन्स येथील बडा कब्रिस्तानात दफन करण्यात आला होता. त्यावेळी कब्रस्तानच्या ट्रस्टवर परवेज इस्माईल सरकारे हा ट्रस्टी होता. परवेजने याकुब मेमन व मेमन कुटुंबियांशी संबंधीत आणखी तीन कब्रची जागा मर्चंट कुटुंबियांना दिली. त्या बदल्यात तीन लाख रुपये घेतले होते. मात्र या व्यवहाराची कोणतिही पावती त्याने मेमन कुटुंबियांना दिली नव्हती. यात आणखी एका आरोपीचा सहभाग असल्याचा आरोप मेमन कुटुंबियांनी केला आहे. पोलिस तपासात आरोपीने बेकायदेशिररित्या आतापर्यंत १० ओट्यांचे पैसे घेतले असल्याचा संशय आहे.

हेही वाचाः- Mumbai local train: ‘या’ कर्मचाऱ्यांनाही लोकल प्रवासाची मुभा

या संपूर्ण गैरव्यवहाराप्रकरणी याकूबचा चुलत भाऊ मोहम्मद अब्दुल रौफ मेमन याने मार्च महिन्यात लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार, मेमन कुटुंबियांच्या मरीन लाईन्स येथील बडा कब्रिस्तानमध्ये सात कब्र आहेत. पण यातील याकुब मेमनसह कुटुंबातील तीन व्यक्तींची कब्र पाच लाख रुपयांना विकण्यात आली होती. या गैरव्यवहारात कब्रिस्तान ट्रस्टला एक अधिकारी व प्रशासनावर आरोप करण्यात आले होते. त्यानुसार याप्रकरणी भादंवि कलम ४६५ (बनाविटीकरण), ४६८ (फसणूकीसाठी बनावटीकरण) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कबर असलेला ओटा विकण्याला कायदेशिरित्या अनुमती नाही. पण संबंधीत कबरींसाठी देखभाल खर्च घेऊन त्या नियमीत करण्यात येतात. पण त्यासाठी ट्रस्टींच्या बोर्डापुढे ठराव मांडला जातो. तो मंजुर झाल्यास ती जागा संबंधीत कुटुंबाची होते. ओटा विकण्यात आलेले मर्चंट कुटुंबियही मेमनच होते. काही वर्षांपूर्वी कायदेशिरित्या त्यांनी त्यांचे आडनाव मर्चंट म्हणून बदलले होते. पोलिस तपासात असे ही समोर आले आहे की, आरोपींनी कब्रस्तानातील अनेक ओट्यांचे मालक हे कित्येक वर्ष न फिरकल्याने आरोपींनी त्या जागा विकल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. अशा साधारण १० ओटे असल्याचे एका अधिका-याने सांगितले.

९३ स्फोटात काय होता याकूबचा रोल

१९९३ मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये २५७ जणांचा बळी गेला होता. तर ७१३ जण गंभीर जखमी झाले होते. याकुबने दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी आर्थिक मदत केल्याचे तसेच मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडविणाऱ्या इतर आरोपींनाही मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याला १९९४ मध्ये काठमांडू येथे अटक करण्यात आली होती. टाडा न्यायालयाने २००७ मध्ये याकुबला फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर त्याने या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही टाडा न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. हा सर्व कट अंमलात आणण्यासाठी याकूब मेमनचाच हात असल्याचे स्पष्ट होत आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले होते. व्यवसायाने चार्टड अकाउंटट असणारा याकुब हा या बॉम्बस्फोटांमागील सूत्रधार आणि फरार आरोपी टायगर मेमन याचा भाऊ होता. याकुबला फाशी देण्याच्या टाडा न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वोच्च न्यायालयानेही समर्थन केले होते. त्यामुळे ऑक्टोबर २०१३ मध्ये याकुबने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आल्यानंतर त्याल जुलै २०१५ ला फाशी देण्यात आली होती. त्यानंतर बडा कब्रिस्तानमध्ये त्याला दफन करण्यात आले होते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा