९३ स्फोटातील मास्टर माइंड टायगर मेननची ओळख अद्याप ‘गुलदस्त्यात’

फरार झालेल्या मुसाला ९३ स्फोटाचा मास्टर माइंड टायगर मेननने पाकिस्तानमध्ये आसरा दिला होता.

९३ स्फोटातील मास्टर माइंड टायगर मेननची ओळख अद्याप ‘गुलदस्त्यात’
SHARES

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमसाठी काम करणाऱ्या मुनाफ हलारी मुसा या गुंडाला मुंबईच्या गुन्हे शाखेच्या मदतीने गुजरात एटीएसने मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. मुंबईत १९९३च्या स्फोटात मुसाचा सहभाग होता. मुसाच्या चौकशीत त्याच्याजवळ पाकिस्तानी पासपोर्ट आढळून आला आहे. हा पासपोर्ट ९३ स्फोटाचा मास्टर माईंड टायगर मेनन ने बनवून दिल्याचा खुलासा मुसाने केला आहे. मुनाफला दीड हजार कोटीच्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी गुजराज पोलिसांनी मागच्या वर्षी अटक केली होती. मात्र जामीनावर बाहेर आल्यानंतर तो फरार झाला होता. 

 

मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बाॅम्ब स्फोटाच्या कटात सहभागी असलेल्या मुनाफ हलारी मुसा याला गुजरात एटीएसने मुंबई विमानतळावरून अटक केली. मुसाला जवेरी बाजार येथे घडवण्यात आलेल्या स्फोटासाठी दुचाकी पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्याने या स्फोटात ३ दुचाकी पुरवल्याचे तपासात पुढे आले होते. यातील एक स्कूटरचा स्फोट झाला. आणि इतर दोन स्कूटर मुंबईच्या नैगम क्रॉस रोड आणि दादर येथील दुचाकीचा स्फोट झाला नाही.अवघ्या दोन तासात मुंबईच्या १२ ठिकाणी १९९३ मध्ये साखळीस्फोट घडवण्यात आले होते. यामागे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि टायगर मेनन यांचा हात असल्याचे चौकशीतून पुढे आले होते. या स्फोटात २५७ जणांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो जखमी होऊन त्यांना कायमचे अंपगत्व आले होते. या गुन्ह्यांत अनेकांना ताडा कोर्टाने दोषी ठरवले आहे. तर या प्रकरणा टायगर मेननचा भाऊ याकूब मेनन याला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. 

हेही वाचाः-७३ वर्षाच्या वृद्धाने केला ८ वर्षाच्या मुलीचा लैगिक छळ

  या गुन्ह्यात फरार झालेल्या मुसाला ९३ स्फोटाचा मास्टर माइंड टायगर मेननने पाकिस्तानमध्ये आसरा दिला होता. पाकिस्तानात त्याने स्वतःचे नाव बदलून अन्वर मोहम्मद या नावाने वावरू लागला. टायगरनेच त्याचे पाकिस्तानातील नेटवर्क वापरून त्याला पाकिस्तानी पासपोर्ट मिळवून दिला. पाकिस्तानी नागरिक असल्याचे भासवून त्याने केनियाच्या नायरोबी येथे वास्तव्यास होता. नायरोबीमध्ये तो मॅनम आफ्रीका नावाने व्यवसाय करत होता. टायगर मेननच्या सांगण्यावरून त्याने  धान्याच्या विशेषत: तांदळाच्या आयात व निर्यातीचे काम सुरू केले. मात्र हा तर दिखावाच होता. त्या आढ तो भारतात अंमली पदार्थांची तस्करी करत होता. काही दिवसांपूर्वी गुजरात पोलिसांनी एका अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक केली होती. त्याच्या चौकशीतून हे अंमली पदार्थ कराचीतून आणल्याचे उघडकीस आले. गुजरातमध्ये हाजी हसन नावाच्या व्यक्तीसोबत त्याने अंमली पदार्थाची बोलणी केली होती. त्यावेळी हाजीने मुसाला गुजरात मार्गे स्फोटक ही पुरवण्याचे आश्वासन दिल्याचे चौकशीतून पुढे आले होते.


मुंबई स्फोटानंतर मुसा पाकिस्तानी पासपोर्टवर दोन वेळा भारतात येऊन गेला होता. २०१४ मध्ये अटारी बाॅर्डरमार्गे तो भारतात आला होता. त्यानंतर मुंबई गाठल्याचे चौकशीत पुढे आले आहे. पाकिस्तान यंत्रणेंने ही त्याचे दोन वेळा पासपोर्टचे नुतणीकरण केले आहे. मात्र मुसाच्या अटकेनंतर ही ९३ स्फोटातील आरोपी टायगर मेनन याची कोणतिही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. स्फोटानंतर परदेशात पळालेल्या टायगर मेननचा कोणताही नवीन फोटो अथवा माहिती मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाकडे नाही. तो जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला. याबाबत ही कुणाला माहिती नसल्यामुळे टायगर मेनन चे पुढे काय झाले हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

हेही वाचाः- ‘त्या’ चालकाला न्याय न मिळाल्यास ‘उबेर’ला न्यायालयात खेचू

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा