देशात CAA आणि NRC विरोधात बोलणाऱ्या जयपूरच्या कवी बप्पादित्य सरकारला सांताक्रूझ पोलिसांत खेचणाऱ्या उबेर चालक रोहित गौरचा परवाना ‘उबेर’ने चौकशीच्या नावाखाली तात्पूरता रद्द केला होता. हा परवाना २४ तासात तात्काळ सुरू करावा. अन्यथा ‘उबेर’ कंपनीला न्यायालयात खेचण्याचे आवाहन दिल्लीतील एका वकिलाने दिले आहे. रोहितने CAA आणि NRC बाबत दाखवलेल्या जागृकतेबाबत त्याचा राजकिय पक्षांनी सत्कार ही केला होता.
हेही वाचाः- आता वॉर्डांची ओळख रंगावरून होणार
जयपूरमधील कवी बप्पादित्य सरकार ३ फेब्रुवारीला काला घोडा फेस्टिव्हलमध्ये सादरीकरण केलं. त्यानंतर तो नागपाडा येथे सीएए-एनआरसीविरोधात सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी होऊन घरी जाण्यासाठी निघाला होता. घरी जाताना तो जुहू येथे मित्राला भेटून कुर्ला येथे घरी जाण्यासाठी त्याने रोहित सिंहच्या उबेर गाडी बसला. गाडीत दोघांमध्ये CAA आणि NRC वरून चर्चा सुरू होती. त्यावरून दोघांमध्ये मतभेद ही झाले. त्यावेळी राग अनावर झालेल्या रोहितने कवी बप्पादित्यच्या न कळत,गाडी सांताक्रूझ पोलिस ठाण्याच्या दिशेने वळवली. पोलिस ठाण्याबाहेर गाडी लावल्यानंतर रोहित सिंह एटीएममधून पैसे काढण्यासाठी जातो असे सांगून पोलिस ठाण्यात गेला. पोलिस ठाण्यात जाऊन त्याने कवी बप्पादित्य हे CAA आणि NRC बोलत असल्याचे तक्रार त्याने पोलिसांना करत, कवी बप्पादित्य याला अटक करण्याची मागणी केली. ते पाहून बप्पादित्यच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांसमोर रोहित कवी बप्पादित्यला ‘तुम्ही लोक आमचा देश नष्ट करायला निघाले असताना’ आम्ही फक्त पाहत बसायचं का ? असं ओरडत तो पोलिसांकडे अटकेची मागणी करु लागला.
हेही वाचाः- ग्रँट रोड व गोरेगावकरांना 'बेस्ट'चा दिलासा
रोहित सिंह पोलिसांना सांगू लागला की, “तुम्ही याला अटक करा. हा देश जाळण्याबद्दल बोलत होता. माझ्याकडे सगळी रेकॉर्डिंग आहे”. पोलिसांनी यानंतर जवळपास दोन तास बप्पादित्य सरकारची चौकशी केली. वकिलाने मध्यस्थी केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. यावेळी जातानाही पोलिसांनी त्याला गळ्यात लाल स्कार्फ घालू नको, तसंच नेहमी हातात डफली घेऊन फिरु नको. सध्या नाजूक वेळ आहे असा सल्ला दिला. पोलिसांनी बप्पादित्य सरकारकडे त्याचं कुटुंब, नोकरी, मित्र आणि विचारसरणी या सगळ्याबद्दल चौकशी केली. पोलिसांनी त्याचे व्हॉट्सअॅप चॅट तसंत फोन रेकॉर्डही तपासून त्याला सोडून दिले. “टॅक्सी चालकाचं एक वाक्य सतत माझ्या डोक्यात फिरत आहे. मी तुला कुठेही घेऊन गेलो असतो पण आभार मान पोलीस ठाण्यात घेऊन आलो,” असं बप्पादित्य सरकारने सांगितले.या प्रकरणी पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचाः- ७३ वर्षाच्या वृद्धाने केला ८ वर्षाच्या मुलीचा लैगिक छळ
Just had a talk with the Brave Nationalist Rohit Gour
— Ishkaran Singh Bhandari (@ishkarnBHANDARI) February 10, 2020
who reported suspicious activity in @Uber ride to police as a good citizen.
Instead of awarding him, @Uber_India suspended him.
In case his suspension is not revoked in 24 hrs then will take Civil & Criminal legal action.
या घटनेनंतर उबेरने रोहितचा उबेर चालक परवाना घडलेल्या घटनेच्या चौकशीच्या नावाखाली रद्द केला. २४ तासानंतर उबेरकडून त्याचा परवाना देणे अपेक्षित आहे. मात्र उबेरने परवाना सुरू न केल्यास उबेर कंपनीला न्यायालयात खेचण्याचे आवाहन दिल्लीतील वकिल इशान सिंग भंडारी यांनी दिले आहे. त्यावर रोहितने इशान यांचे आभार मानले आहेत.