Advertisement

आता वॉर्डांची ओळख रंगावरून होणार

मुंबई उपनगरातील (Mumbai suburb)१५ वॉर्डांना (ward) आता 'रंगओळख' (colour) मिळणार आहे. प्रत्येक वॉर्डातील एका महत्त्वाच्या चौकाची निवड करून, त्याचा पूर्णपणे कायपालट केला जाणार आहे.

आता वॉर्डांची ओळख रंगावरून होणार
SHARES

मुंबई उपनगरातील (Mumbai suburb)१५ वॉर्डांना (ward) आता 'रंगओळख' (colour) मिळणार आहे. प्रत्येक वॉर्डातील एका महत्त्वाच्या चौकाची निवड करून, त्याचा पूर्णपणे कायपालट केला जाणार आहे. वॉर्डातील एका वर्दळ असलेल्या चौकाचं नियोजनपूर्ण सुशोभीकरण (Beautification) केलं जाणार आहे. 

उपनगरांतील महत्त्वांच्या रस्त्यांवर, यंत्रणांच्या समन्वयाअभावी नियोजनाचा (planning) बोजवारा उडाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) व मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासनाने एक आराखडा तयार केला आहे. सुशोभीकरण (Beautification), सुसूत्रता, सुरक्षितता ही त्रिसूत्री अंमलात आणली जाणार आहे. यानुसार वॉर्डातील महत्त्वांच्या ठिकाणांसह, दुभाजक, रेलिंग्ज आदी दर्शनी भागातील घटकांना वॉर्ड (ward) नुसार ठरलेला रंग (colour) देण्यात येणार आहे. यामुळे रंग पाहून आपण कुठल्या वॉर्डात प्रवेश केला आहे हे कळणार आहे. 

शहरातील महत्त्वांच्या चौकांवर अस्वच्छता, तुटलेले फलक, लटकलेल्या तारा, प्रचंड वाहतुककोंडी, बेशिस्त वाहनचालकांची मनमानी आदी नेहमीच दिसून येते. हे चित्र पालटण्यासाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे. कायापालट करण्यात येणाऱ्या चौकात आजूबाजूच्या परिसराची माहिती, योग्य दिशादर्शक, सुटसुटीत सिग्नल यंत्रणा,विविध यंत्रणांनी मुख्य रस्त्यांवर उखडलेल्या वाहिन्या, लटकणाऱ्या तारा, फ्लेक्सचा बंदोबस्त करून एकाच ठिकाणी नियोजनपूर्ण पद्धतीने सुविधा पुरवल्या जाणार आहेत. हा आराखडा मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) वरिष्ठ अभियंतांच्या टीमकडून तयार करण्यात आला आहे. प्रत्येक वॉर्ड (ward) साठी १ कोटी याप्रमाणे १५ कोटींचा निधी ठरवण्यात आला आहे. हेही वाचा -

अखेर सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त मिळाला

मुंबईतील धरण, तलाव होणार पर्यटनस्थळ
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा