मुंबईच्या महापौरांना धमकी देणाऱ्यास गुजरातमधून अटक


मुंबईच्या महापौरांना धमकी देणाऱ्यास गुजरातमधून अटक
SHARES

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या आरोपीला गुजरात जामनगरमधून ताब्यात घेण्यात आलं असून मुंबई पोलीस पथक उद्या आरोपीसह मुंबईत दाखल होणार आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीच नावं मनोज दोढीया असून तो २० वर्षाचा आहे. हे कृत्य का केलं याचा शोध मुंबई पोलीस करीत आहेत. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विलास तुपे यांच्या पथकाने गुजरात जामनगर मधून या आरोपीला अटक केली आहे. धमकी देण्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी पोलिस त्याची अधिक चौकशी करत आहेत.

हेही वाचाः- बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियममध्ये ५० टक्के सवलत

 राजकीय वर्तुळात सध्या महापालिका निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू आहे. राजकीया पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांचेशाब्दिक युद्ध सुरू असतानाच महापालिकेच्या महापौरांना धमकीचा कॉल आला आहे. २१ डिसेंबर मुंबई महापालिका कार्यालयात असताना किशोर पेडणेकर यांना अनोळखी नंबरवरून कॉल आला. कॉलवर बोलणा-या व्यक्तीने आपले नाव न सांगता थेट जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देणारी व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. महापौरांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत त्या व्यक्तीने पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांनी म्हटले होते. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास महापालिकेत असताना हा कॉल आला. त्यानंतर दोन दिवसांनी पेडणेकर यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ५०४,५०६(२),५०७,५०९ अन्वये  अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दूरध्वनी करण्यात आलेल्या क्रमांकाच्या माहितीवरून पोलिसांना आरोपी गुजरातमधील जामनगर येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यााल याप्रकरणी गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले असून संशयीताला मुंबईत आणून धमकी देण्यामागच्या कारणांची चौकशी करण्यात येणार आहे.

हेही वाचाः- ठाण्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद, जलवाहिन्यांची तातडीची दुरुस्ती

मुंबईत आल्यानंतर संशयीताला अटक करण्यात येण्याची शक्यता आहे. पुढे न्यायालयात हजर करण्यात येईल. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मातोश्रीवरही असाच धमकीचा फोन आला होता. दुबईतून फोन आल्याचे समोर आले होते. मातोश्री उडवून देण्याची धमकी फोन करणा-या व्यक्तीने दिली होती. त्या संशयीताला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा