'आशिकी २'च्या गायिकेला त्रास देणाऱ्या चाहत्याला अटक


'आशिकी २'च्या गायिकेला त्रास देणाऱ्या चाहत्याला अटक
SHARES

'आशिकी २' आणि 'प्रेम रतन धन पायो' अशा चित्रपटातील गीतांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी गायिका पलक मुच्छलला त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी नुकतीच अटक केली. राजेश शुक्ला असं या व्यक्तीचं नाव असून आंबोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राजेश गेल्या काही दिवसांपासून पलकला फोन करून धमकी देत होता.


कोण आहे आरोपी?

राजेश शुक्ला प्रोफेसर असून मुळचा बिहारचा राहणारा आहे. पलक आणि बॉलिवूडमधल्या इतर गायकांना भेटण्या भेटण्यासाठी तो मुंबईत आला होता. टेलिफोन डिरेक्टरीतून पलकचा नंबर मिळवल्याचं राजेश शुक्लानं पोलिसांना सांगितलं. पलकचा नंबर मिळाल्यानंतर तो तिला वारंवार कॉल करू लागला. चाहता असल्याचं सांगून त्यानं पलककडे भेटण्याची इच्छा व्यक्त केली.


धमकावू लागला

पण, पलकनं नकार देताच राजेश नाराज झाला. त्यानंतर तो तिला मेसेज करून शिव्या देऊ लागला. इतकंच नाही तर तू मला भेटायला आली नाहीस तर मी तुझ्या घरी येईन. मला तुझ्या घरचा पत्ता माहीत आहे, अशा प्रकारे धमकावू लागला.

राजेशच्या कॉल आणि मेसेजला कंटाळून अखेर पलकनं आंबोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी राजेशला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल इथून अटक केली. पोलिसांनी राजेश विरोधात ३५४ (डी)आणि धमकी दिल्याप्रकरमी ५०६ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. राजेश शुक्लाकडे इतर कुठल्या सेलिब्रिटीचा नंबर तर नाही ना? याचा पोलीस तपास करत आहेत


हेही वाचा-

गोवंडीत हॉटेलमध्ये गोळीबार, ५ जणांना अटकRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा